• Mon. Jun 15th, 2026

केज शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह कधी? शहरात नाही एकही सार्वजनिक स्वच्छतागृह लाज वाटत नाही का सत्ताधाऱ्यांना? आपल्या आई,बहिणीला मोकळ्या जागेत जावे लागते!

Bybaba maske

Aug 9, 2025

केज शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह कधी?

शहरात नाही एकही सार्वजनिक स्वच्छतागृह

लाज वाटत नाही का सत्ताधाऱ्यांना?

आपल्या आई,बहिणीला मोकळ्या जागेत जावे लागते!

रोखठोक न्यूज वार्ताहर 

सर्वाधिक वेगाने विस्तार होणाऱ्या केज शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांची वानवा आहे. नगराध्यक्ष सह नगरसेवकांपर्यंत सर्वजण फक्त रस्ते  विकासाच्या गप्पा मारत असताना महिला स्वच्छतागृहांबाबत सर्वांनीच मिठाची गुळणी धरलेली आहे.

शहरात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना आणि त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्नही उद्भवत आहेत.शहरात कंळब रोड,बीड रोड,अंबाजोगाई रोड,कानडी रोड,मंगळवार पेठ,शुक्रवार पेठ, रोज्जा मोहल्ला,छत्रपती शिवाजी चौक,डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक,जयभवानी चौक अशे मोठ्या बाजार पेठेचे ठिकाणे आहेत सर्व ठिकाणे कायम गजबजलेली व वर्दळीची आहेत.10 ते15 शाळा,20 कोचिंग क्लासेस आहेत यातील विद्यार्थी,त्यांना भेटण्या साठी येणाऱ्या पालक महिला. शहरात एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला, बाजारात खरेदीला किंवा शासकीय कामांसाठी घराबाहेर पडल्यानंतर महिलांना नैसर्गिक विधीसाठी पुन्हा घरीच यावे लागते, अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.या शिकणाऱ्या लहान मुलांना भेटण्यासाठी माता शहरात कायम येतात. तसेच शासकीय कामे, दवाखान्यांत आलेल्या महिलांनी नैसर्गिक विधीसाठी जायचे कुठे, असा प्रश्न आहे.ऐवढे सगळे असताना सत्ताधारी नगरपंचायत चे कारभारी महिला साठी साधे स्वच्छतागृह उभारू शकत नाहीत. विकासाच्या पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या बाता मारणारे महिलांच्या प्रश्नावर गप्प असतात.

आपल्या ही घरी आई,बहीण आहेत त्यांना उघड्यावर शौचास,लघुशंका करण्या साठी गेल्यावर लाज वाटत असेल का नसेल?तीच लाज सत्ताधाऱ्यांना कधी वाटणार आहे का नाही? हाच एक प्रश्न शहरातील व खेड्या पाड्यातून येणारी आया, बहिणी विचारात आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!