• Mon. Jun 15th, 2026

चंदनसावरगाव शिवारात विद्युत मोटार केबलीच्या चोरीचा धुमाकूळ!

Bybaba maske

Aug 10, 2025

चंदनसावरगाव शिवारात विद्युत मोटार केबलीच्या चोरीचा धुमाकूळ!

रोखठोक न्यूज/प्रतिनिधी

शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असताना शेतातील विद्युत पंप,वायर चोरीच्या घटना वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.केज तालुक्यातील चंदनसावरगाव शिवारातून शेतकऱ्यांच्या लाखोंच्या केबल वायरची चोरी गेल्या असून.चोरटे शेतशिवारांमध्ये मोठ्या चोऱ्या करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण पसरले आहे.

केज तालुक्यातील चंदनसावरगाव रस्त्यालगत परिसरात शेतकऱ्यांचे विदयुत मोटार,स्टर्टर, पाईप,वायर चोरणारी मोठी टोळी सक्रिय झाली असुन शेतकऱ्यांचे शेतातील साहित्य चोरीचे प्रमाण वाढले असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.अंदाजे सात ते आठ शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यानी मागील महिन्यात मध्यरात्री शंकर शिवाजी तपसे यांच्या शेतातील सर्व सोलर प्लेट ची चोरी केली.तसेच दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पुरुषोत्तम तपसे यांच्या शेतातील दोन पाणबुडी मोटर व वायर,व्यंकटी तपसे यांच्या विहिरीतील मोटार,वायर,तसेच गणेश उकंडे यांच्या शेतातील पाणबुडी मोटार व वायर तर अशोक श्रीराम तपसे यांच्या शेतातील पाणबुडी मोटर,बाळासाहेब तपसे यांचे वायर असे चोरी झालेले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!