• Mon. Jun 15th, 2026

आ.नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून गुंड गल्ली ते हानुमान गल्ली सिमेंट रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू!!    शेवटी नगरपंचायत ने एनओसी दिली.

Bybaba maske

Aug 10, 2025

आ.नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून गुंड गल्ली ते हानुमान गल्ली सिमेंट रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू!!   

शेवटी नगरपंचायत ने एनओसी दिली.

रोखठोक न्यूज/ प्रतिनीधी

 आ.नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नातून गुंड गल्ली ते हानुमान गल्ली सिमेंट रोड चे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून नगरपंचायत ने अखेर एनओसी दिल्याने  रखडलेल्या गुंड गल्ली, लोंढे गल्ली ते हानुमान गल्ली या कामाची आज सुरुवात झाली असून या तिन्ही गल्लीतील रहिवासी व महिला तसेच गुंड गल्ली गणेश मंडळ, संगम गणेश मंडळ लोंढे गल्ली केज, श्रीराम गणेश मंडळ व हानुमान गणेश मंडळ,हानुमान गल्ली केज तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमदार नमिता मुंदडा यांचा तात्काळ दखल घेऊन गुंड गल्ली ते हनुमान गल्ली सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाची सुरुवात केल्यामुळे सदरील भागातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती या भागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे.

सदरील रस्ता रहदारीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या रस्त्याचे काम यश कंट्रक्शन कंपनी कडून केले जात आहे. सदरील रस्ता दर्जेदार होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!