चिंचोली सर्कलमधील 10 गावाच्या जलजिवन घोटाळ्याच्या चौकशी साठी आमरण उपोषण.
सुशांत खवतड व विष्णु घुले घोटाळा उघडकीस येणार का?
केज पंचायत समितीसमोर रोहन गंलाडे यांचे उद्या पासून आमरण उपोषण.
रोखठोक न्यूज वार्ताहर

केळगाव, जाधव जवळा, आरणगाव, डोनगाव, टाकळी, कदमवाडी, शिरपुरा,व इतर तीन अश्या दहा ते बारा गावात जलजिवन चे कामच केले नसल्याचे दिसून येत आहे.
पंकजा मुंडे यांच्या खासदार स्थानिक निधीतून एक पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती.पुन्हा त्याच गावाना “हर घर जल” योजने अंतर्गत जलजिवन योजनेतंर्गत पुन्हा योजना मंजूर होते त्यात पंकजा मुंडे यांच्या खासदार स्थानिक निधीतून मंजूर झालेल्या निधीतून या योजनेचे कामे झाले व हेच कामे जलजिवन योजनेतंर्गत झाले असल्याचे दाखवून बिल उचलल्याचे आरोप रोहन गंलाडे हे करत आहेत.
म्हणजेच एकाच पाणीयोजना पण दोनदा निधी!
या दोन्ही योजनेतंर्गत पाणीपुरवठय़ाचे काम झाल्याचे कागदोपत्री दावा केला आहे.मात्र गावात अजून ही पाणीटंचाई आहेच.मग निधी कुठे गेला जर पंकजा मुंडे यांच्या आणलेल्या निधीतून योजना पूर्ण झाली असेल तर जलजिवन योजनेचा निधी कुठे वापरला गेला?
या जलजिवन योजनेतंर्गत कामात मोठा घोटाळा झाल्या असल्याचा दावा करून रोहन गंलाडे हे उद्या पासून पंचायत समितीसमोर अमरण उपोषण करणार आहेत.
