• Fri. Sep 11th, 2026

अंबाजोगाईत भीषण आग : ‘फेमस’ फर्निचर मॉल भस्मसात, लाखोंचे नुकसान.

Bybaba maske

Aug 12, 2025

अंबाजोगाईत भीषण आग : ‘फेमस’ फर्निचर मॉल भस्मसात, लाखोंचे नुकसान.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

अंबाजोगाई शहरात मंगळवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. शहराच्या मंडीबाजार भागात असलेल्या ‘फेमस’ फर्निचर या शॉपिंग मॉलला अचानक आग लागून संपूर्ण मॉल भस्मसात झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या, गादीचे साहित्य, कपडे व इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आग वेगाने पसरली.

या आगीत मॉलमधील सर्वच साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार मालकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून, विद्युत शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशामक विभागाने पंचनामा सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!