• Sat. Jun 27th, 2026

बीड जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी

Bybaba maske

Sep 15, 2025

बीड जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी

रोखठोक न्यूज वार्ताहर 

 बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील पूर्व परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. आष्टी तालुक्यातील 52 लोकांना रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून सुखरूप पणे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर प्रशासन अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टीतून वगळण्यात आले असल्याचे पत्रात म्हटले आहे.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!