• Sat. Jun 27th, 2026

अर्चना कुटे अखेर सीआयडीने घेतले ताब्यात. मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप.

Bybaba maske

Sep 16, 2025

अर्चना कुटे अखेर सीआयडीने घेतले ताब्यात.

मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

 कुटे ग्रुपच्या संचालक अर्चना कुटे यांना पुण्यातून सीआयडीच्या टीमने ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. ज्ञानराधातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्या फरार होत्या. अखेर पुण्यातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला होता. यामुळे अनेक ठेवीदारांनी आपले प्राण ही सोडले. सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. अखेर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात आहे.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!