• Mon. Oct 6th, 2025

लक्ष्मण बेडसकर ला महिला पुरवणारी ती बाई कोण? अल्पवयीन मुली पुरवत असेल तर तिच्यावर पोस्को लागणार का? बेडसकर च्या तक्रार अर्जात अनेकाचे नावे!

Bybaba maske

Sep 23, 2025

लक्ष्मण बेडसकर ला महिला पुरवणारी ती बाई कोण?

अल्पवयीन मुली पुरवत असेल तर तिच्यावर पोस्को लागणार का?

बेडसकर च्या तक्रार अर्जात अनेकाचे नावे!

रोखठोक न्यूज वार्ताहर 

लक्ष्मण बेडसकर प्रकरणात खुप ट्वीस्ट आहेत त्याचा उहापोह होणे गरजेचा आहे.लक्ष्मण बेडसकर वर पोस्को लागण्या अगोदर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्यात एकूण परिस्थिती बघतली तर वेगळाच संशय निर्माण होत आहे. मावशी व पिढीत बालिका केक घेण्या साठी आई ला सोडून येणे रस्त्यात लक्ष्मण बेडसकर भेटणे चला तुम्हाला चहा,नाष्टा चारतो म्हणून गाडीत बसवने.अनोळखी असलेल्या बेडसकर बरोबर गाडीत का बसले?

सद्न्यान असलेल्या मावशीला शहर संपले तरी अंधारात कोठे घेऊन जात आहे हे कसे कळाले नाही? मुकादम असलेला बाळू साठे ला लगेच कळते की यांना कुठे तरी वाईट हेतु साठी घेऊन जात आहेत तो लगेच पीडितेच्या आईला फोन करतो व लगेच तिच्या आईला घेऊन गाडीचा पाठलाग करतो.मग यात प्रश्न उपस्थित होतो की बाळू साठे ला माहीत होते का पुढे काय घडणार आहे.तो तीच्या आईला बोलवून गाडीत बसवून पाठलाग करतो, बाळू साठे ला सर्व प्रकार जर अगोदरच माहीत असेल तर तो तात्काळ शहराच्या बाहेर जायच्या अगोदरच त्यांना अडवले असते आई ला फोन करून ती येई पर्यंत वाट बघून आईला घेऊन नियोजित जागे पर्यंत ऐवढा वेळ का घेतला?

आई व वाहन चालक बाळू साठे व्यतिरिक्त अजुन कोण कोण गाडीत होते? असे भरपूर प्रश्न अनुत्तरित आहेत या वर केज पोलीस तपास करतील का?

या अगोदर बेडसकर प्रकरणात काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्यात एक महिला व बेडसकर चे संभाषण आहे त्यात हा महिला बदल बोलत आहे व ती महिला बेडसकर ला महिला परवते असे लक्षात येते तर मग त्या महिलेवर पोलीस तपास करून गुन्हा नोंदवतील का?

जर अल्पवयीन मुली पुरवत असेल तर पोक्सोअंतर्गत गुन्हा त्या महिलेवर नोंद होईल का?

लक्ष्मण बेडसकर चा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज. 

बेडसकरे तक्रारी अर्जात काय म्हटले?

केज येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्यावर दि. १९ सप्टेंबर रोजीएका अत्यवयीन मुलीचा त्याच्या गाडीत घेऊन जात निर्जन ठिकाणी जात तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याप्रकरणाला आता वेगळे वळण मिळायाची शक्यता असून हा एक कट असल्याचे तीन पानाचे लेखी निवेदन गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी केज पोलिसाना दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी त्यांच्या कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता घाटे, सुनीत केंद्रेआणि धारूर तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ता सादिक इनामदार यांच्या नावाचा उल्लेख आहे, तसेच दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याव्या सुमारास बेडसकर बीड कडून येत असताना त्यांना केज येथील शासकीय विश्रामगृहा समोर तक्रार दार अल्पवयीन मुली सोबत असलेली महिला ही त्यांना काही बोलायचे आहे असे म्हणून ती १६ वर्षाची मुलगी आणि तिची सहा वर्षांची मुलगी त्यांच्या कार मध्ये बसल्या 

त्यानंतर त्या महिलेने त्यांना चिचपुरच्या मारुती मंदिर रस्त्याने रुपेश कोल्हे यांच्या शेता पर्यंत घेऊन गेली, त्यावेळी एका स्कॉर्पिओ गाडीतून तोंडाला स्कार्फ बांधलेले चार ते पाच गुंड आले. त्यांनी बेडसकर यांना दमदाटी करून त्यांच्या जवळील त्याचा सैमसंग कंपनीचे एस-२४ अल्ट्रा हा मोबाईल आणि ३ एटीएम कार्ड, पैन कार्ड, आधार कार्ड काढून घेऊन निघून गेले. तसेच त्यांना बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार करण्याची धमकी दिली. अशी तक्रार दिली बेडसकर यानी दिली असल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

केज येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडरकर यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल होण्ये पूर्वी केज पोलिसांना एक लेखी निवेदन दिले होते, त्यात त्यांनी हा त्याच्या विरुद्धचा कट असून या कटात त्यांच्या कार्यालयातील दोन शिक्षण विस्तार अधिकारी आणि धारूर येथील एका सामाजिक कार्यकत्यांसह अन्य एकाच्या अज्ञात भावाचा समावेश असल्याचे तीन पानाच्या पत्रात लेखी निवेदन केज पोलिस ठाण्यात दिले आहे. त्यमुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

बेडसकरला प्रकरण मिटविण्यासाठी केली होती दहा लाखांची मागणी

बेडसकर याचा मोबाईल घेऊन जाणा-यानी त्याच फोनवरून बेडसकर याच्या पत्नीला सदरील प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. असेही बेडसकर याने पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

एकंदरीत बेडसकर याची अत्यंत गंभीर तक्रार असताना देखील पोलिसांनी या संदर्भात काय तपास केला हाही महत्वाचा प्रश्न आहे.पोलिसांनी यासंदर्भात कारवाई का नाही केली असे एक ना अनेक प्रश्न आतया अनुषंगाने पोलिसांवर देखील उपस्थित केले जात आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!