शिवसेना डॉक्टर सेलच्या बीड जिल्हाप्रमुखपदी डॉ.किरण वनवे यांची निवड
रोखठोक न्यूज प्रतिनिधी
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तुवाला स्मरून व शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.डॉ.श्रीकांत शिदे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश प्रमुख डॉक्टर सेलचे डॉ.धनंजय गोविंदराव पडवळ, यांच्या नेतृत्वाखाली डॉ.किरण वनवे यांची शिवसेना डॉक्टर सेल अंतर्गत डेंटल विंग,बीड जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदूहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विचार तळागाळात पोहचवून पक्ष वाढीसाठी व सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे डॉ. किरण वनवे यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.