• Sun. Jul 26th, 2026

केज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गट – गणाचे आरक्षण जाहीर ! युसुफवडगावात पुन्हा भावकी आमने सामने.राहूल सोनवने विरुद्ध सौरव सोनवने लढत  विष्णु घुले, संतोष हंगे यांना डायरेक्ट गुलाल नाहीच.

Bybaba maske

Oct 13, 2025

केज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गट – गणाचे आरक्षण जाहीर !

युसुफवडगावात पुन्हा भावकी आमने सामने.राहूल सोनवने विरुद्ध सौरव सोनवने लढत 

विष्णु घुले, संतोष हंगे यांना डायरेक्ट गुलाल नाहीच.

 रोखठोक न्यूज वार्ताहर 

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रक्रियेला आता गती आली आहे.

आज बीड जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत सोडत काढली . तर तालुकास्तरावर तहसिल कार्यालयात तहसीलदार यांच्या उपस्थितीत सोडत काढली गेली. या आरक्षण सोडती कडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे, पुढाऱ्यांचे, कार्यकर्त्यांची लक्ष लागून होते.

केज तालुक्यात सर्वात जास्त लक्ष हे युसुफवडगाव सर्कल वर असेल कारण खासदार बजरंग सोनवणे हे आपले चिरंजीव सौरव सोनवणे यांना राजकारण उतरवणार अशी चर्चा आहे हे जर सत्य असेल तर मग त्यांना हक्काचा असा मतदारसंघ म्हणजेच युसुफवडगाव पण यात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहूल सोनवणे यांनी सुद्धा तयारी केली असल्याचे समजते त्यामुळेच येथे सारणी या बजरंग सोनवणे व राहूल सोनवणे यांच्ये गाव.या गावातील ग्रामपंचायत च्या निवडणुकीत ते आमने सामने आले होते व यात राहूल सोनवणे यांनी बाजी मारली होती. आता जिल्हा परिषदेचे कोणते सोनवणे बाजी मारतात हे अवचित्याचे ठरेल.

तर येवता सर्कल मधून तयारी करत असलेले विष्णु घुले यांना डायरेक्ट गुलाल नाहीच या अगोदर त्यांच्या पत्न परिमाळा घुले या पंचायत समितीत निवडून आल्या होत्या व त्यांना पंचायत समितीचे सभापती पद भुषवले होते आत्ताही परिमाला घुले यांनाच येवता सर्कल लढवावे लागेल आता त्यांच्या विरोधात कोण उमेदवार येतो ते बघावे लागेल. 

नांदुर सर्कल मधून माज जिल्हा परिषद सभापती संतोष हंगे यांनाही डायरेक्ट गुलाल नाही या वेळेस त्यांना सुद्धा आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरावे लागेल. 

केज तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट व पंचायत समितीचे १४ गण आहेत.

जिल्हा परिषद गट

विडा –खुला प्रवर्ग (महिला)

आडस-ओबीसी पुरुष

होळ- अनुसूचित जाती महिला

युसूफवडगाव- खुला पुरुष

चिंचोलीमाळी-ओबीसी महिला

नांदूरघाट -ओबीसी महिला

येवता -ओबीसी महिला

असे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पडले आहे.

पंचायत समिती गण

विडा-खुला प्रवर्ग 

दहिफळ वडमाउली-खुला प्रवर्ग 

आडस- ओबीसी प्रवर्ग 

तांबवा-खुला प्रवर्ग महिला

येवता -ओबीसी महिला

होळ-खुला महिला

बनसारोळा- अनुसूचित जाती SC महिला

युसूफवडगाव-अनुसूचीत जाती SCपुरुष

सोनीजवळा-खुला प्रवर्ग महिला

चिंचोलीमाळी-खुला प्रवर्ग 

उमरी -खुला प्रवर्ग 

नांदूरघाट-खुला प्रवर्ग महीला

शिरूरघाट- ओबीसी 

वरपगाव-ओबीसी महिला

अशाप्रकारे आरक्षण निश्चिती झालेली आहे त्यामुळे आता उद्यापासून सर्व इच्छुक कार्यकर्ते, नेते मंडळी आता पुढील संभाव्य उमेदवार कामाला लागतील. परंतु या आरक्षणामुळे काही खुशी कभी गम असे वातावरणातून अनेक इच्छुकांना मात्र आता नमते घ्यावी लागणार आहे काहींना लॉटरी लागणार आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!