• Sat. Jun 27th, 2026

केज येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय बनले दलालाचा अड्डा,दस्त नोंदणीसाठी घेतले जातात हजारो रुपये

Bybaba maske

Oct 11, 2025

केज येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय बनले दलालाचा अड्डा,दस्त नोंदणीसाठी घेतले जातात हजारो रुपये.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहरातील सह दुय्यम कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असुन दस्त नोंदणीसाठी गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्यांचा सपाटा चालु असुन गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या दलालांचा व संबंधित कर्मचारी यांचा बंदोबस्त करुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा अशी मागणी पक्षकारांकडुन केली जात आहे.याबाबत सविस्तर बातमी अशी की,शेत जमिनी अथवा घर जागा खरेदी विक्री करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले मुल्यांकन भरुन शासन नियमानुसार विविध कागदपत्रांची पूर्तता करुन दस्त नोंदणीसाठी प्रक्रिया केली जाते.शासन निर्णया प्रमाणे नियमानुसार पुर्ण फिस भरणा करुनही दस्त नोंदणीसाठी हजारो रुपये दलालांच्या मध्यस्थीने कर्मचारी घेत आहेत. शासनाचा पगार असताना सुद्धा सर्व सामान्य जनते कडुन अतिरिक्त पैशाची मागणी केली जात आहे. मुल्यांकन काढुन दिले जात असताना ही डील केली जाते व व्यवहार पुर्ण झाल्यानंतर हा व्यवहार केला जातो.ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाते. आमचे कोणीही काहीच करु शकत नाही अशा आविर्भावात दलाल व कर्मचारी वावरत आहेत तरी यांच्या व नातेवाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करून आर्थिक व्यवहार तपासणी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!