• Sat. Jun 27th, 2026

केज डिवायएसपी म्हणून आयपीएस श्री व्यंकटराम यांची नियुक्ती.

Bybaba maske

Oct 10, 2025

केज डिवायएसपी(पोलीस उपअधीक्षक) म्हणून आयपीएस श्री व्यंकटराम यांची नियुक्ती.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

जिल्ह्याला आणखी एका भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची भेट मिळाली आहे. केज उपविभागीय अधिकारी म्हणून आयपीएस व्यंकटराम यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या रूपाने दोन आयपीएस अधिकारी कार्यरत होते. श्री व्यंकटराम हे आता बीडमधील तिसरे आयपीएस अधिकारी ठरले आहेत.

केज उपविभागासाठी यापूर्वी नियुक्त झालेले अधिकारी रुजू न झाल्याने त्यांच्या जागी श्री व्यंकटराम यांची नियुक्ती करण्यात आली आआहे श्री व्यंकटराम हे त्रिपुरा राज्याचे केडरबेस अधिकारी आहेत त्यांची सहाय्यक अधीक्षक म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे.यापूर्वी आयपीएस पंकज कुमावत यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या होत्या. त्यामुळे नवीन श्री व्यंकटराम यांच्या कडून ही अपेक्षा उंचावल्या आहेत. 

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!