• Sat. Apr 18th, 2026

रमेश आडसकर यांना जिल्हापरिषदेत धोक्याची घंटा. युसुफवडगाव सोडल तर केज, धारुर,अंबाजोगाई कुठेच विश्‍वासाचा गट नाही. काँग्रेस कडून राहूल सोनवणे,शरद पवार गटाकडून सौरव सोनवणे व अजित पवार गटाकडून ऋषिकेश आडसकर लढत होईल?

Bybaba maske

Oct 14, 2025

रमेश आडसकर यांना जिल्हापरिषदेत धोक्याची घंटा.

युसुफवडगाव सोडल तर केज, धारुर,अंबाजोगाई कुठेच विश्‍वासाचा गट नाही.

काँग्रेस कडून राहूल सोनवणे,शरद पवार गटाकडून सौरव सोनवणे व अजित पवार गटाकडून ऋषिकेश आडसकर लढत होईल?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

रमेश आडसकर यांना किंवा त्यांचे पुतणे ऋषिकेश आडसकर यांना युसुफवडगाव सोडल तर केज, धारुर, अंबाजोगाई या तिन्ही तालुक्यातून कोठूनच जिल्हा परिषदेत जाण्या साठी मार्ग राहिला नाही.कधी काळी केज धारुर अंबाजोगाई तालुक्यातून वर्चस्व असलेले कुटूंब आज विस्थापित होत चालय केज तर त्यांचा बालेकिल्ला होता पण ते ही बेचिराख झाला आहे. आज कुठल्या गटातून लढाव…लढाव तर जिल्हा परिषद गटच नाही अशी परिस्थीती झाली आहे.स्वतःचा आडस हा गट व गण दोन्ही ओबीसी साठी सुटल्याने आता आडसकर कुठला पर्याय निवडतात हे लवकरच कळेल.कधी काळी आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवणारे आज एका जिल्हा परिषद गटा साठी मोहतल झाले आहेत गेल्या काही वर्षांपासून पराभव त्यांचा पिछा सोडत नाही.ययुसुफवडगाव  जिल्हा परिषद मध्ये त्याच्या पत्नी अर्चना आडसकर तर चिंचोली गटाातुन त्याचे पुतणे ऋषिकेश आडसकर यांचा पराभव झाला होता, स्वःता रमेश आडसकर याांचा माजलगाव मतदारसंघातून दोनदा आमदारकीचा झालेला पराभव.गेल्या पंचवार्षिक मध्ये ऋषिकेश आडसकर यांनी पंचायत समिती विजयी प्रवेश केला ऐवढच पण या पंचवार्षिक मध्ये ना जिल्हापरिषदेत गट राहीला न पंचायत समितीत लढण्या साठी गण राहिला. त्यामुळे या जिल्हापरिषदे निवडणूकीत पुन्हा आपले पुतणे  ऋषिकेश आडसकर यांना युसुफवडगाव सर्कल मधून लढण्यास उतरवतात का हे बघणे अवचित्याचे राहील जर असे झाले तर काँग्रेस कडून राहूल सोनवणे,शरद पवार गटाकडून सौरव सोनवणे व अजित पवार गटाकडून ऋषिकेश आडसकर अशी तिरंगी लढत होईल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!