• Fri. Sep 11th, 2026

केजमध्ये तुफान राडा, बसेसवर दगडफेक, प्रवाशांना दगड लागले, अनेक जण जखमी अंदोलकांचा केज तहसील मध्ये ठिय्या.

Bybaba maske

Oct 14, 2025

केजमध्ये तुफान राडा, बसेसवर दगडफेक, प्रवाशांना दगड लागले, अनेक जण जखमी

अंदोलकांचा केज तहसील मध्ये ठिय्या.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

बीड जिल्ह्यातील केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. महामंडळाच्या अनेक बस गाड्यांची तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. काही प्रवाशांना देखील दगड लागल्याने ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

केजमध्ये आंदोलक आक्रमक

बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी राजश्री राठोड या गेल्या १२ दिवसांपासून उपोषण करत आहेत या अंदोलनाच्या समर्थनात केज तहसील समोर अंदोलकानी बैलगाडी जाळली होती आज पुन्हा बाळासाहेब आवारे यांच्या नेतृत्वात 

रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात येत होते.या दरम्यान अंदोलकांना पोलीस समजून सांगत असताना बाळासाहेब आवारे यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेतले होते. अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन तासाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू असल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलन थांबवण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पोलिसांनी मध्यस्थी करूनही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. मागणी मान्य होत नसल्याने काही तरूण आक्रमक झाले होते. त्यांनी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. दगडफेकीत काही एसटी गाड्यांचे नुकसान झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची पांगापाग झाली. या नंतर सर्व अंदोलक केज तहसील कार्यालयात घुसले व तिथेच न्याय मिळे पर्यंत बसणार अशी भुमीका घेतली आहे.सर्व अंदोलक अजून पर्यंत तहसील कार्यालयात बसून आहेत.तहसीलदार राकेश गिड्डे पोलीस उप अधीक्षक चेतना तिडके पोलीस सहाय्यक अधीक्षक व्यंकटराम अंदोलकाना समजावून सांगत आहेत पण अंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!