• Sat. Apr 18th, 2026

होळ मधून अंजली घाडगे व केतकी सातपुते राष्ट्रवादी कडून इच्छुक. होळ म्हणजे मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष पदाचा दरवाजा

Bybaba maske

Oct 15, 2025

होळ मधून अंजली घाडगे व केतकी सातपुते राष्ट्रवादी कडून इच्छुक.

होळ म्हणजे मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष पदाचा दरवाजा.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

जिल्हापरिषदेराजकारणालाा  आता ज्वर चढू लागला आहे,जेष्ठ नेते मंडळी आप आपले गड चाचपून बघत आहेत, आपले गड शाबूत आहेत की नाही कारण मिनी मंत्रालय समजणार्‍या जिल्हापरिषदची निवडणूक होऊन बराच टप्पा ओलांडून गेला आहे.आज होईल उद्या होईल निवडणूक या भरवशावर शड्डू ठोकून उभे रहाणारे पैलवान आरक्षणा मुळे अचानक बॅकफूटवर गेले आहेत मग आता आपल्या समर्थकांना रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत अश्यातच विधानसभेची गेल्या दहा वर्षा पासून तयारी करत असलेल्या अंजली घाडगे यांच्या नावाची चर्चा अनुसूचित जाती महिला साठी राखीव असलेल्या गटातून चालु झाली आहे. २०२९ ला केज राखीव असलेला मतदारसंघ हा खुला होऊ शकतो म्हणून आता जिल्हा परिषदेत आपला हाथ आजमावून मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत रहाता येईल.

अंजली घाडगे या रमेश आडसकर समर्थक असून त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

तसेच केतकी किरण सातपुते या ही होळ जिल्हापरिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचे चिन्ह आहेत तसे त्यांनी निवडणूक लढवणार जाहीर केले आहे पण पक्ष अजून सांगीतला नाही.त्यांच्या पतीचे मेव्हणे माजी मंत्री संजय बनसोड हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असल्याने ते उमेदवारी प्रतिष्ठेची करून आणू शकतात पण स्थानिक पातळीवर त्याना किती सपोर्ट भेटतो याच्यावर अवलंबून आहे. भाजपकडून येथे उमेदवार दिला जातो का राष्ट्रवादी व भाजपची युती होते हे बघावे लागेल.पण आज तरी अंजली घाडगे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!