• Thu. Apr 30th, 2026

रोहन गलांडे यांची उत्तुंग भरारी केज तालुकाध्यक्ष ते युवक प्रदेशाध्यक्ष निवड, कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य !

Bybaba maske

Nov 3, 2025

रोहन गलांडे यांची उत्तुंग भरारी केज तालुकाध्यक्ष ते युवक प्रदेशाध्यक्ष निवड, कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य !

रोखठोक न्यूज वार्ताहर 

 केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष पदी,सचिव चंद्रकांत जाधव व कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती देऊन निवड करण्यात आली आहे तरी रोहन गलांडे यांनी कुणबी मराठा महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद गुळभिले यांचे व वरीष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत रोहन गलांडे यांनी म्हटले की संघाने माझी नियुक्ती आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन केलेली आहे. मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक छोटे मोठे आंदोलने केले आहेत त्यांची दखल घेऊन मला अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे मी यापुढेही असेच सर्वसामान्य जनतेसाठी सर्व जातिधर्मातील नागरिकांनसाठी कायम लढत राहील शेवटच्या श्वासापर्यंत व महाराष्ट्रात अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे संघटीकरण मोठ्या संख्येने करणार आहे असे वचन संस्थापक अध्यक्ष यांना दिले आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!