• Sun. Apr 19th, 2026

मटका किंग गणेश खराडे वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी. केज ,धारुर, कंळब अश्या तिन तालुक्यात मटक्याच साम्राज्य. मटका बुक्याच्या धाडीत १०६३२० मुद्देमाल जप्त.

Bybaba maske

Nov 15, 2025

मटका किंग गणेश खराडे वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी.

केज ,धारुर, कंळब अश्या तिन तालुक्यात मटक्याच साम्राज्य.

मटका बुक्याच्या धाडीत १०६३२० मुद्देमाल जप्त.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज तालुक्यात अवैध धंध्यांचा सुळसुळाट झाला असून मोठ्याप्रमाणावर मटका नावाचा जुगार चालवला जातो तसेच केज तालुक्यातील आजू बाजूचे तालुके धारुर व कंळब येथे ही मटका चालवलला जातो या सर्व बुक्याचा मालक गणेश खराडे हा व्यक्ती असून स्वतःला “मटका किंग” ही उपाधी लावून घेतली असून यातून करोडो रूपयांचा व्यवहार करत आहे.गोरगरीब जनतेला काही रूपयांचे अमिश दाखवून यात ओढले जाते व त्याची सरास लुट करतात.एक रूपयाला नव्वद रूपयाचा भाव मिळण्याच्या अमिशाने गरिब १ रूपय १० रूपया पासून खेळणारा हा जुगार हजारो रूपयांवर येऊन थांबतो. यात कित्तेक जन बरबाद होतात पण यांचा मटका काही लागत नाही.या मटक्या पाई लोंकानी घर,शेत, पत्नीचे मंगळसूत्र सुद्धा विकुण टाकले आहे. अश्या हा जनतेला बरबाद करणाऱ्या खेळात मटका किंग म्हणून संबोधीत करून घेणारा मटक किंग जनतेच्या लुटीच्या पैश्यावर गडगंज, अफाट संपत्तीचा मालक झाला आहे.

अश्या तिन तालुक्यातील लोंकाच्या स्वप्नांशी खेळून त्यांचे जिवन नरक करणाऱ्या गणेश खराडे नामक नराधामास कारागृहातील कोठडी शिवाय पर्याय नाही यास तात्काळ एमपीडीए अंतर्गत अटक करून यांची बीड कारागृहात रवानगी झाली पाहीजे.

सहायक पोलीस अधिक्षक व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली केज शहरात दोन ठिकाणी मटका बुक्या वर छापा मारला असता १०६३२० मुद्देमाल जप्त करण्यात आला यात मटका किंग गणेश खराडे सह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!