• Sun. Apr 19th, 2026

मटका किंग गणेश खराडेला बेड्या कधी? लाखो संसारावर फिरवला वरवंटा.

Bybaba maske

Nov 16, 2025

मटका किंग गणेश खराडेला बेड्या कधी?

लाखो संसारावर फिरवला वरवंटा.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

तीन तालुक्याचा मटका किंग म्हणून पांढर्‍या शुभ्र काॅलर काढून समाजबांधवात मिरवणारा समाजविघातक कृत्य करणाऱ्या गणेश खराडे वर एमपीडीए अंतर्गत कारवाई कधी हा सामान्य लोकांतून उठणारा प्रश्न आहे?

दो दशका पासून समाजात लागलेली ही किड कोणाच्या अशिर्वादाने समाजात वावरत आहे.कित्येक संसाराची या गणेश खराडे मुळे माती होऊन उद्ध्वस्त झाली आहेत..मोल मजुरी करून आलेल्या तुटपुंज्या पैश्यातून श्रीमंत होण्याच्या अशेने दहा/ पाच रूपयाचा मटका खेळणारा कधी आख्या आठवड्याची कमाई या मटक्या पाई  उडू लागला समजून येऊ लागले नाही मग रिकामा खिसा घेऊन पोटाची आग विझवणे अशक्य झाले यातच घरात खटके उडून संसाराचे शकले उडू लागले अशे हजारो घराची कहाणी रोज पाहू शकतात.

अश्या या गोरगरिबांच्या पैश्यावर अल्पवेळेत, बंगला,फोरचुरन गाडी,शेती,हायवे लगत करोडोंची पाॅपर्टी अशी कितीतरी बेनामी संपती जमा केली. ना याच्या वर इन्कम टॅक्स ची कारवाई ना महाराष्ट्रत प्रसिद्ध असलेली इडीची कारवाई होते.गरिबांचे शोषलेले पैसे त्यातूनच निर्माण झालेले काळ्या पैशाचे इमले तरीही पांढरे काॅलर उडवत जगणारी ही समाजाची वाळवी कधी संपुष्टात येईल. 

एक दो बुक्या वर थातूरमातूर कारवाई करून यांच्यावर काहीच फरक पडणार नाही.बाॅम्ब स्फोटत जसे स्लिपर शेल वापरले जातात तसे यांचे स्लिपर शेल गल्लोगल्ली, खेडोपाडी,पसरले आहेत. 

हे सगळ उद्ध्वस्त करायचे असेल तर गणेश खराडे सारख्या नराधमास म्होरक्यास एमपीडीए अंतर्गत लवकरात लवकर कारवाई करून कारागृहात पाठवले पाहीजे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!