• Wed. Jun 24th, 2026

शिकवणीला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून डोंगरात निर्जनस्थळी नेऊनअत्याचार

Bybaba maske

Jan 8, 2026

शिकवणीला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून डोंगरात निर्जनस्थळी नेऊनअत्याचार

रोखठोक न्यूज वार्ताहर 

शिकवणीला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून डोंगरात निर्जनस्थळी नेऊनअत्याचार केल्याची घटना ७जानेवारी रोजी घडली.

केज तालुक्यातील एका गावातील साडेपंधरा वर्ष वयाच्या एका अल्पवयीन मुलीसोबत धीरज बाळासाहेब सांजुरे याची ओळख झाली होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने धीरज सांजुरे याने ६ जानेवारी रोजी त्या अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ७जानेवारी २०२६ रोजी सकाळी पीडित अल्पवयीन मुलगी ही

शिकवणी साठी  केज येथे आली असता सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास धीरज सांजुरे याने तिला एका कारमध्ये बसवून केज येथून धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात नेले. तिथे गेल्यानंतर निर्जनस्थळी कोणी नसल्याची संधी साधून त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकारानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना ही माहिती सांगितली. पालकाने पीडित मुली घेऊन केज पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!