चित्रकला विश्वातील नामवंत कलारत्न,अर्जुन भालेराव यांचे निधन.
रोखठोक न्यूज वार्ताहर
चित्रकला विश्वात नामवंत तथा मितभाषी सर या नावाने परिचित असलेले व्यक्तीमत्व अर्जुन भालेराव यांचे अल्पक्षा आजराने आज ज्योत मालावली.
चोरांबा ता . धारुर गावाचे सुपुत्र आणि प्रसिध्द चित्रकार अर्जुन भालेराव सरांची ओळख होती. त्यांनी धारूर येथे जनता विद्यालयात कला शिक्षक म्हणून नोकरी केली,त्यांना चित्रकलेची व फोटोग्राफीची आवड होती त्यानी आपली नोकरी सांभाळून फोटोग्राफीचा व्यवसाय ही सांभाळत होते त्यांचे धारूर बाजारपेठेत कलासंगम नावाने फोटोग्राफी व पोर्टेट पेंटींग चा व्यवसाय होता. अत्यंत हुबेहुब एकाद्याचे तैलचित्र काढण्यात त्यांचा हातखंडा होता अश्या हुन्नरी कलाकाराचे आज पहाटे १२:३० वा. लातुर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.केज शहरातील फुलेनगर भागातील विठ्ठल काळे यांचे ते जावई होते.त्यांचा अंतिम संस्कार चोंरबा या मुळगावी होणार आहे.
