• Thu. Apr 30th, 2026

दोन लबाड लांडग्यांनी आम्हाला फसवले:बाबुराव पोटभरे. राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे वर भर पत्रकार परिषदेत आरोप. गरिबांच्या जमिनी लाटल्याचा ही आरोप. आठ दिवसांत भरचौकात माफी मागितली नाहितर ॲट्रॉसिटी व ४२० चा गुन्हा दाखल करणार.

Bybaba maske

Jan 20, 2026

दोन लबाड लांडग्यांनी आम्हाला फसवले:बाबुराव पोटभरे.

राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे वर भर पत्रकार परिषदेत आरोप.

गरिबांच्या जमिनी लाटल्याचा ही आरोप.

आठ दिवसांत भरचौकात माफी मागितली नाहितर ॲट्रॉसिटी व ४२० चा गुन्हा दाखल करणार.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

अंबाजोगाई-अंबाजोगाई ची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांच्या आग्रहास्तव आलो होतो.एक जागा विनोद शिंदे यांना देण्यात आली होती.या जागेमुळे मोदींच्या जागेवर अडचण होईल, म्हणून त्यांनी स्विकृत नगरसेवक म्हणून शिंदे यांची निवड करण्यात येईल, असे आश्वासन देऊन एक ५०० रूपयाच्या बाॅन्ड वर नोटरी करून शपथ पञ देण्यात आले होते.

माञ ते आश्वासन पाळले नाही.म्हणून राजकिशोर  मोदींवर गुन्हा दाखल होवू शकतो.ॲट्रासिटी ॲक्ट नूसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत आहोत. तसेच पृथ्वीराज साठे यांच्यावर ४२० चा  फसवणूकीचा म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा.

लबाडी,करण्यात माहीर असलेले राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे हे कार्यकर्त्यांना सोबत घेवून जमिनी बळकावण्याचे काम करतात.त्यामुळे लवकरच जनआंदोलन करण्यात येईल.तसे पुरावे माझ्या कडे असल्याचे पोटभरे यांनी सांगितले. प्रतिस्पर्धच गटाचे  म्हणणे होते की. तुम्ही माघार घेउ नये आम्ही केवळ आंबेडकर वादी लोकांचे नुकसान होहू नये या करिता माघार घेतली.

 अंबाजोगाई मध्ये दोन  लबाड लांडगे आहेत आज पर्यंत त्यानी निवडणुकीत दलित व मुस्लिम समाजाला भूल थापा दिल्या आहेत.

प्रभाग क्रमांक मधील निवडणुकीच्या बाबतीत आम्ही हाय कोर्टात जाणार आहोत . राजकिशोर मोदी यांचे स्वीकृत नगरसेवक पद ६ वर्षा साठी रद्द करण्यात यावे अन्यथा राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे यांच्या तोंडाला काळे फसणार आहोत.असे विनोद शिंदे यांनी म्हटले आहे.

आठ दिवसांत जर राजकिशोर मोदी श पृथ्वीराज साठे यांनी भरचौकात आंबेडकरी जनतेची माफी मागितली नाही तर यांच्या घरावरतर मोर्चे काढूच व दोघांवर गुन्हे दाखल करू असे वक्तव्य बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे यांनी आज झालेल्या पञकार परिषदेत व्यक्त

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!