मटका चालक गणेश खराडे ची हर्सूल जेल मध्ये रवानगी.
MPDA कायद्या अंतर्गत कारवाई.
मटका किंग चाँद शेख ला कधी उचलणार?
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज, धारुर तालुक्यातील मटका चालक गणेश सुधीर खराडे याला एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. गणेश खराडे च्या कारवाई ने काही प्रमाणात मटक्याचा व्यवसाय अटोक्यात येईल पण केज तालुक्यात चाँद शेख हा एक मटका किंग असून तो स्वतंत्र मटका घेतो सहसा तो पोलीसांच्या रडारवर नसल्याने हमेशा कारवाईतून वाचला जातो जो पर्यंत चाँद शेख ला एमपीडीए अंतर्गत कारवाई करून जेल मध्ये पाठवल जात नाही तो पर्यंत केज तालुका मटका मुक्त होऊन गोरगरीब लोंकाचे संसार वाचणार नाहीत.
त्या मुळेच चाँद शेख वर लवकरात लवकर कारवाई करून केज तालुका मटका मुक्त करावा असा जनतेचा सुर तालुक्यातून निघत आहे.
गणेश खराडे वर झालेल्या कारवाईने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,पोलीस उपअधीक्षक रामानंद, पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवने यांनी मेहनत घेतली.
