• Thu. Apr 30th, 2026

केजच्या माजी सरपंचासह व्यापारी सव्वा आठ लाखाच्या बनावट नोटांसह जेरबंद  तामिळनाडूत पेट्रोल पंपावर नोट चलनात आणताना पोलिसांच्या

Bybaba maske

Jan 31, 2026

केजच्या माजी सरपंचा सह व्यापारी सव्वा आठ लाखाच्या बनावट नोटांसह जेरबंद 

तामिळनाडूत पेट्रोल पंपावर नोट चलनात आणताना पोलिसांच्या जाळ्यात

रोखठोक न्यूज वार्ताहर 

तामिळनाडू राज्यात तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवकुडी पोलिसांनी केज तालुक्यातील डोका गावातील माजी सरपंचासह एका व्यापाऱ्यास ८ लाख ३७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह २१ जानेवारी रोजी पकडले आहे. 

     केज तालुक्यातील डोका येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे (वय ५४) व शहरातील माया मशनरी दुकानाचा मालक राजस्थानी नारायण राम पटेल(वय ३४) हे दोघे कारने (एम. एच. ४४ झेड २३८३) तामिळनाडू राज्यात गेले होते. २१ जानेवारी रोजी तिरुचिरापल्लीतील थुवकुडी येथे पेट्रोल पंपावर इंधन भरून त्यांनी बिलासाठी २०० रुपयांची काही नोटा दिली असता, तिथल्या कर्मचाऱ्याला संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चेकपोस्ट येथे त्यांची कार अडवून झडती घेतली. ज्यात बनावट नोटांच्या बॅगा सापडल्या. या सर्व नोटा २०० रुपयांच्या ४१ बंडल आढळून आले. त्यांनी यापूर्वी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात ही या बनावट नोटा वापरल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सीबी – सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. तर आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या, बनावट नोटा कुठून मिळवल्या, या नोटांचे तामिळनाडू कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!