• Thu. Apr 30th, 2026

नगरपंचायत केज च्या ८ कोटी १० लाखाच्या घरकुल निधी वर कोणी डल्ला मारला. सत्ताधाऱ्यांना माहीत असताना पत्रकार परिषद घेण्या पेक्षा गुन्हे दाखल का केले नाहीत?या सर्व प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी, व नगरपंचायत अधीक्षका कडे संपूर्ण संशयची सुई जात आहे.

Bybaba maske

Feb 4, 2026
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

नगरपंचायत केज च्या ८ कोटी १० लाखाच्या घरकुल निधी वर कोणी डल्ला मारला.

सत्ताधाऱ्यांना माहीत असताना पत्रकार परिषद घेण्या पेक्षा गुन्हे दाखल का केले नाहीत?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज नगरपंचायत अंतर्गत घरकुल च्या निधीत अफरातफर झाली असून २०१९ते२०२२ पर्यंत च्या कार्यकाळात एकूण ८ कोटी १० लाखांचा घोटाळा २०१९ ते २०२२ मध्ये झाला आहे पण संबंधित घोटाळा २०२६ मध्ये उघडकीस येतो याचे अश्चर्य वाटत नाही का? का जाणूनबुजून या कडे दुर्लक्ष केले गेले.

अगोदर सत्ताधारी जनविकास आघाडी ने पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली ती ही मोघम, घोटाळा कोणी केला हे न सांगताच त्याचा शोध पत्रकारांनी घ्यावा असे म्हणून मौन बाळगले त्यामुळे सगळी संशयाची सुई काँग्रेस कडे गेली त्यानंतर माजी नगराध्यक्ष अदित्य पाटील यांनी हा घोटाळा आमच्या कार्यकाळात झाला नसल्याच सांगीतल.

सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले जनविकास आघाडी व काँग्रेस च्या या  भुमिके बदल संशय निर्माण होत असताना आज बुधवार दिवशी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून या घोटाळ्याची चौकशी होणार असून यातून घोटाळा कोणी केला ते समोर येईल.

या सर्व प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी, व नगरपंचायत अधीक्षका कडे संपूर्ण संशयची सुई जात आहे.

ज्या हातांनी त्यांना अनुदान वाटायचे होते, त्याच हातांनी हा निधी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार केज नगरपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल ८ कोटी १० लाख रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आता संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष बुधवारपासून सुरु होणान्या चौकशीकडे लागले आहे.

केज नगरपंचायतीच्या लेखापालने केलेल्या परीक्षणात तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने घरकुल निधीचा अपहार केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून केंद्र सरकारचा ४ कोटी ४८ लाख आणि राज्य सरकारचा ३ कोटी ६२ लाख असा एकूण ८ कोटी १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी महाराष्ट्र आला होता. केज नगरपंचायतीने या निधीसह व्याजा ची रक्कम लाभार्थींना वाटण्या ऐवजी चक्क ठेकेदार आणि काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर वर्ग केली. म्हाडाच्या वित्त नियंत्रकांनी दोन वेळा पत्र देऊन हो रक्कम पुन्हा मूळ खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे गेली तीन,चार वर्ष झाली लाभार्थी अनुदानासाठी नगरपंचायतीचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांना केवल आश्वासने आणि टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!