• Thu. Apr 30th, 2026

स्वतःच्या स्वार्था साठी मा.आ.संगीता ठोंबरे यांचा शिंदेसेनेत प्रवेश. १५ वर्षापासून विवादीत सूतगिरणी चालु करायची आहे. स्वतःच्या पती साठी जिल्हा परिषद साठी उमेदवारी.

Bybaba maske

Jan 19, 2026

स्वतःच्या स्वार्था साठी मा.आ.संगीता ठोंबरे यांचा शिंदेसेनेत प्रवेश.

१५ वर्षापासून विवादीत सूतगिरणी चालु करायची आहे.

स्वतःच्या पती साठी जिल्हा परिषद साठी उमेदवारी.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज मतदारसंघातील माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी काही तुरळक कार्यकरत्या सह सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेत प्रवेश केला.भाजप आमदार ते राष्ट्रवादीत शरद पवार गट ते शिवसेना शिंदेसेना असे एक वर्तुळ पूर्ण 

गेल्या विधानसभेत निवडणूक लढवण्याची हवा करून कुठुन उमेदवारी भेटते का याची चाचपणी केली पण कुठेच काही मागमूस दिसेना भाजपने कड्डीपत्या सारखे बाजूला टाकले होते तिथे दाळ शिजवता येईना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला पण तेथेही मा.आ.पृथ्वीराज साठे नी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे उमेदवारी प्रतिष्ठेची केली व उमेदवारी खेचून आणली तरिही विधानसभे साठी अपक्ष फाॅर्म ठेवला वातावरण चांगले होते भाजप मधील काही स्थानिक नेते मदत करायला तयार होते पण सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सर्व नाराज भाजप नेत्यांची मोठ बांधली व संगीता ठोंबरे यांचा नाइलाज होऊन उमेदवारी माघे घ्यावी लागली. 

एक पर्याय म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला सरकार येईल अपेक्षा होती कारण लोकसभेत तशी हवा होती ती विधानसभेत राहिली नाही व पुन्हा भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली.

१५ वर्षापासून विवादीत सूतगिरणी चालु होण्याच्यी कुठलीच हालचाल नाही,  त्याच वेळेस  सरपंच देशमुख यांची हत्या प्रकरणात सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट हे भेट देण्या साठी मस्साजोग येथे आले होते त्याच वेळेस त्यांनी सूतगिरणीला भेट दिली होती व संगीत ठोंबरे यांच्या कडे भोजन ही केले होते त्या नंतर आता त्याच सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेत प्रवेश करून सूतगिरणी साठी काही निधी व जिल्हापरिषद  गटातून आपले पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्या उमेदवारी साठी पक्ष प्रवेश केल्याचे मानले जात आहे.कि संगीता ठोंबरे यांनाच जिल्हा परिषद अध्यक्ष पद तर खुनवत नाहीना याचीही चर्चा मतदासंघात आहे.कारण होळ जिल्हापरिषद राखीव गट झाला असून तिथून त्या निवडणूक लढवू शकतात?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!