• Sat. Apr 18th, 2026

केजडी नदी विकास प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा? १४ कोटी ५५ लाख मंजूर, प्रत्यक्ष काम शून्य. सार्वजनिक बांधकाम व गुत्तेदार यांची मिली भगत आहे का?

Bybaba maske

Feb 6, 2026

केजडी नदी विकास प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा?

१४ कोटी ५५ लाख मंजूर, प्रत्यक्ष काम शून्य.

सार्वजनिक बांधकाम व गुत्तेदार यांची मिली भगत आहे का?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहरातील केजडी नदीवर ग्रीन झोन व रिव्हर फ्रंट विकास प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजने करता २०२२ ते २०२३ तब्बल १४ कोटी ५५ लाख ३१ हजार ३२२ रुपये मंजूर सन २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षांत करण्यात आले होते. मात्र इतका प्रचंड निधी मिळूनही प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पावर मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत नदी सुशोभीकरण, बाग विकास, वृक्षलागवड, शौचालय, पावसाचे पाणी साठवण, विद्युत व्यवस्था आदी कामे प्रस्तावित होती. परंतु प्रत्यक्ष पाहता नदी परिसर अजूनही अस्वच्छ, दुर्लक्षित आणि विकासापासून दूर आहे.

 कागदावर कोट्यवधी, जमिनीवर काहीच नाही

प्रकल्पाच्या अंदाजपत्रकावर वरिष्ठ अभियंते व अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. सर्व तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. तरीही प्रत्यक्षात हा प्रकल्प फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांचा सवाल आहे की,

“जेव्हा शासनाने १४ कोटींपेक्षा जास्त निधी दिला, मग तो खर्च झाला कुठे? काम का झाले नाही?”

आकड्यांमध्येही संशय

दस्तऐवजात वर एका ठिकाणी खर्च सुमारे १.८२ कोटी दाखवण्यात आला आहे, तर खाली तांत्रिक मंजुरी १४.५५ कोटींची आहे. या दोन आकड्यांमधील प्रचंड फरक अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

हा फरक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आहे की जाणीवपूर्वक केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

 भ्रष्टाचाराची दाट शक्यता

काम न करता निधी खर्च दाखवण्यात आल्याचा गंभीर संशय नागरिक व्यक्त करत आहेत. यात ठेकेदार, संबंधित अधिकारी व प्रशासन यांची संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर वेळेत चौकशी झाली नाही, तर हा पैसा जनतेच्या तोंडचा घास लुटल्यासारखा ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

 प्रशासन मौन का?

इतका मोठा प्रकल्प रखडलेला असताना प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांची ही शांतता संशय वाढवणारी आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!