• Sun. Jun 28th, 2026

“सुनसान तळ्यावर १८ कोटींची उधळपट्टी! नागरिकांपासून दूर ‘राजीव गांधी तळे’ बनणार गैरप्रकारांचे अड्डे?” केज शहरात एक मुतारी, शौचालय नाही या ठिकाणी २३ लाखांचे शौचालय. सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत,व गुत्तेदार सी.बी.बिक्कड कन्स्ट्रक्शन यांचे काम. 

Bybaba maske

Feb 15, 2026

सुनसान तळ्यावर १८ कोटींची उधळपट्टी! नागरिकांपासून दूर ‘राजीव गांधी तळे’ बनणार गैरप्रकारांचे अड्डे?”

केज शहरात एक मुतारी, शौचालय नाही या ठिकाणी २३ लाखांचे शौचालय.

सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत,व गुत्तेदार सी.बी.बिक्कड कन्स्ट्रक्शन यांचे काम. 

रोखठोक न्यूज | विशेष प्रतिनिधी | केज

केज शहरातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी झगडत असताना, शहरापासून तब्बल पाच किलोमीटर अंतरावर अडगळीत व निर्जन भागात असलेल्या राजीव गांधी तळ्याभोवती तब्बल १८ कोटी ३६ लाख रुपयांचा तथाकथित विकास प्रकल्प राबवला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या वापरापासून पूर्णपणे दूर असलेल्या या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून नेमका कोणाचा विकास केला जात आहे? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनेहे कामे होत असून याचे गुत्तेदार म्हणून सी बीड बिक्कड कन्स्ट्रक्शन हे कामे करत आहेत, तसेच जागा देणे व स्वतःच काही हिस्सा देणे हे नगरपंचायत चे काम आहे.

शहरा पासून पाच किलोमीटरवर जागा दिल्याने आता नगरपंचायत चौकशीच्या फेऱ्यात आहे, कारण ऐवढी लांब शहरा बाहेर विकास करून काय साध्य होणार आहे, केज-बीड रोड मानवलोकच्या मागच्या बाजूस तलाव आहे केज- बीड रोडच्या लगत आहे,जर वर्षी केज येथील गणपतीचे विसर्जन येथे होते ही जागा परफेक्ट असताना राजीव गांधीचे तळे नावाने प्रसिद्ध असलेले असे अडगळीत जागेची निवड नगरपंचायत ने का केली?

केज शहरात गेल्या चार वर्षांत साधी मुतारी न बांधु शकलेली नगरपंचायत चे कारभारी या तलावा च्या बाजूस तब्बल २३ लाखाची शौचालय उभे होत आहे.

खर्च — पण नागरिक कुठे?

अधिकृत खर्च तपशील धक्कादायक आहेत —

लेकफ्रंट विकास — 12.03 कोटी

शिल्पे व भित्तीचित्रे — 48 लाख

वॉटर फाउंटन — 48 लाख

बाग-बगीचा — 29.56 लाख

शौचालय — 23.83 लाख

ग्रीन रूम — 13.13 लाख

रेन वॉटर हार्वेस्टिंग — 14.43 लाख

कन्सल्टन्सी व प्रशासकीय खर्च — 1.43 कोटी

इलेक्ट्रिफिकेशन — 63.50 लाख

GST सहित एकूण — 18.36 कोटी

शहरात रस्ते, पाणी व आरोग्य सुविधा अपुऱ्या असताना सुनसान भागात कारंजे, शिल्पे आणि सौंदर्यीकरणावर कोट्यवधींचा वर्षाव होत असल्याने हा विकास नसून निधीचा मोकळा उधळपट्टी मेळा असल्याची चर्चा सुरू आहे.

 विकासाच्या नावाखाली गैरवापराची भीती

स्थानिक नागरिकांच्या मते, शहरापासून दूर, निर्जन आणि नियंत्रण नसलेल्या या परिसरात —

रात्रीच्या वेळी गैरप्रकार वाढण्याची शक्यता

मद्यपान, बेकायदेशीर हालचाली व असामाजिक कृत्यांचे अड्डे तयार होण्याचा धोका

कुटुंबांसाठी असुरक्षित वातावरण

अशा गंभीर शक्यता असूनही प्रशासनाने जागेची निवड का केली? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 नागरिकांचा थेट आरोप

“लोक नसलेल्या ठिकाणी विकास म्हणजे सार्वजनिक सुविधा नाही, तर काही मोजक्या अंबट शौकीन लोकांसाठी तयार होणारा स्पॉट आहे,” असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

 गुत्तेदारांचा विकास की जनतेची फसवणूक?

प्रकल्पात प्रत्यक्ष गरजेपेक्षा सजावटीच्या कामांवर जास्त खर्च, कन्सल्टन्सीवर कोट्यवधी रुपये आणि वापर नसलेल्या जागेची निवड — या सर्व बाबींमुळे संपूर्ण प्रकल्पावर संशयाची सावली गडद झाली आहे.

 चौकशीची मागणी तीव्र

या कामाची जागा, खर्चाचे प्रमाण, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष उपयोगिता यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा “विकास” नावाखाली केजमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची चर्चा आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!