• Sun. Jul 26th, 2026

कलाकेंद्रातून परतताना भांडणाच्या रागातून केज तालुक्यातील साळेगाव येथील तरुणाचा खून.,५ आरोपींना पोलिस कोठडी पाच मित्रांनी दारू पाजून नेले चोराखळीतील कलाकेंद्रात

Bybaba maske

Feb 16, 2026

कलाकेंद्रातून परतताना भांडणाच्या रागातून केज तालुक्यातील साळेगाव येथील तरुणाचा खून.,५ आरोपींना पोलिस कोठडी

पाच मित्रांनी दारू पाजून नेले चोराखळीतील कलाकेंद्रात

रोखठोक न्यूज वार्ताहर

कळंब तालुक्यातील (जि. धाराशिव) चोराखळीतील महाकाली कला केंद्रातील नर्तिकेची कला पाहून परतत असताना मागील भांडणाच्या रागातून केज तालुक्यातील तरुणाचा ५ मित्रांनी गुरुवारी (१२ मृत सतीश मुंडे फेब्रुवारी) खून केला. सतीश मुंडे (३७, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोबत असणाऱ्या पाच जणांनीच खून केल्याचे मृताचे वडील भागवत मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता पाच जणांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात नृत्य पाहण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत सतीश मुंडे आणि त्याचे सहकारी मित्र शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील, संजय गिते, मधुकर इंगळे, दत्ता तोंडे,
रा. साळेगाव, ता. केज, बीड) गेले होते. या दरम्यान वरील सहकाऱ्यांनी सतीश यास दारू पाजून चोराखळी येथील महाकाली कला केंद्र येथे नेले. कार्यक्रम पाहून परतत असताना जुन्या भांडणाच्या
लाथा-बुक्क्याने मारहाण केली व त्यास ठार मारले. येरमाळा पोलिसांनी आरोपींना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे करत आहेत. दरम्यान, कला केंद्राच्या परवान्याप्रकरणी कोर्टात प्रकरण सुरू असून हा निर्णय सर्वांना लागू असेल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव यांनी सांगितले.
झोपेत आहे असे सांगत घरी सोडले

सतीश याला सोबतच्या सहकाऱ्यांनी घरी आणून सोडले. त्याला झोप लागली आहे. तो उठतच नाही, असे त्याच्या घरच्यांना सांगून घरी सोडले. त्यानंतर वडिलांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, सतीश मुंडे हा एकुलता एक मुलगा होता. तर सतीश याला सात वर्षांचा एकच मुलगा आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!