• Sat. Apr 18th, 2026

केज नगरपंचायतीत विरोधक आहेत की नाहीत? चार वर्षांत तडजोडी शिवाय काही झाले का? सभागृहात शांतता की संगनमत? विकासकामांवर प्रश्नचिन्ह; नागरिकांचा संताप वाढला केज नगरपंचायतीत सत्ताधारी–विरोधकांमध्ये तडजोड? सभागृहातील शांततेवर नागरिकांचा सवाल “केज नगरपंचायतीत विरोधक शांत का? पाच नगरसेवक असूनही प्रश्नचिन्ह”भाग १

Bybaba maske

Mar 15, 2026
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

भाग १

केज नगरपंचायतीत विरोधक आहेत की नाहीत? चार वर्षांत तडजोडी शिवाय काही झाले का?

सभागृहात शांतता की संगनमत? विकासकामांवर प्रश्नचिन्ह; नागरिकांचा संताप वाढला

केज नगरपंचायतीत सत्ताधारी–विरोधकांमध्ये तडजोड? सभागृहातील शांततेवर नागरिकांचा सवाल

“केज नगरपंचायतीत विरोधक शांत का? पाच नगरसेवक असूनही प्रश्नचिन्ह”

रोखठोक न्यूज वार्ताहर

केज नगरपंचायतीत नेमके चालले आहे काय? सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनाच पडू लागला आहे. कारण गेल्या चार वर्षांत सभागृहात ठोस विरोध, मुद्देसूद चर्चा किंवा एखाद्या निर्णयाला ठाम विरोध झाल्याचे चित्र क्वचितच पाहायला मिळत आहे. त्यामुळे नगरपंचायतीत सर्व काही तडजोडीतूनच सुरू आहे का, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

लोकशाही व्यवस्थेत विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सत्तेला मर्यादा घालणारा आणि चुकीच्या निर्णयांवर आरसा दाखवणारा हात जर कमजोर झाला, तर सत्ताधाऱ्यांचे निर्णय बिनधास्त आणि अमर्याद होण्याचा धोका निर्माण होतो. पूर्वी सभागृहातील बैठकींमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांची प्रकरणे उघड करत, प्रश्नांची सरबत्ती करत आणि सत्ताधाऱ्यांना घाम फोडत असत. मात्र, सध्या बैठकीत विरोधक उपस्थित असले तरी त्यांची उपस्थिती फारशी जाणवत नसल्याची टीका होत आहे.

नगरपंचायतीत सध्या जनविकास आघाडीचे ८ नगरसेवक काँग्रेस चे ३, अपक्ष खा.बजरंग सोनवने गटाशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेस  चे ५ नगरसेवक असे बलाबल आहे. जनविकास आघाडी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळे सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती आहेत, तर सोनवणे गट विरोधी बाकांवर आहे. मात्र विरोधी बाकांवर असलेले नगरसेवक सभागृहात ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

दरम्यान, काही विकासकामांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मंगळवारपेठ ते नगरपंचायत असा रस्ता दोन वेगवेगळ्या योजनांतून झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप होत आहे. एक काम नगरोत्थान योजनेतून आणि दुसरे नगरपंचायत निधीतून दाखवले जात असल्याने प्रत्यक्षात दुसऱ्या कामाचा निधी कुठे गेला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. फुले-आंबेडकर नगर येथील रस्ता आणि समाजमंदिराच्या कामांबाबतही अशाच प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील काही भागांत नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करावे लागत आहे. वार्ड क्रमांक १ असो किंवा १३ – तेथील नागरिकांना नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करावे लागले. शहरात अनेक ठिकाणी बोअरवेल बंद असून पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा खंडित राहतो. या प्रश्नांवर स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेणे अपेक्षित असताना ते शांत का आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

केज शहराची वस्ती झपाट्याने वाढत असताना जुन्या गावात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मात्र शहराबाहेरील तुरळक वस्ती असलेल्या भागांत रस्ते करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या सर्व घडामोडींकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याने “सगळे काही ठरवूनच चालले आहे का?” अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, खासदार बजरंग सोनवने यांना केजच्या जनतेने मोठ्या विश्वासाने पाठिंबा दिला असून त्यांच्या गटाचे पाच नगरसेवक नगरपंचायतीत आहेत. त्यामुळे शहराच्या कारभारात त्यांनी अधिक लक्ष घालावे आणि आपल्या नगरसेवकांना जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

सध्या केज नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “विरोधक खरेच आहेत की फक्त नावालाच?” हा प्रश्न शहरात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!