• Mon. May 25th, 2026

ज्येष्ठ पत्रकार श्रावण जाधव यांच्या मातोश्रींचे निधन लव्हुरी येथे शांताबाई देविदास जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन; परिसरात हळहळ

Bybaba maske

Mar 15, 2026

ज्येष्ठ पत्रकार श्रावण जाधव यांच्या मातोश्रींचे निधन

लव्हुरी येथे शांताबाई देविदास जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन; परिसरात हळहळ

रोखठोक न्यूज वार्ताहर

लव्हुरी (ता. केज) येथील श्रीमती शांताबाई देविदास जाधव (वय ८५) यांचे रविवारी (दि. १५) दुपारी सुमारे २.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लव्हुरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रविवारी सायंकाळी सात वाजता गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या झुंजार नेताचे ज्येष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!