• Mon. May 25th, 2026

केज मांजरसुंबा रोडवर दीदी बर्निंग बसचा थरार ! केज जवळ ट्रॅव्हल्स ची बस पलटी : बस पलटी होताच बसने पेट घेतलाअनेक प्रवासी जखमी 

Bybaba maske

Mar 16, 2026

केज मांजरसुंबा रोडवर दीदी बर्निंग बसचा थरार 

केज जवळ ट्रॅव्हल्स ची बस पलटी : बस पलटी होताच बसने पेट घेतलाअनेक प्रवासी जखमी 

गौतम बचुटे/केज :- 

केज मांजरसुंबा रोडवर पहाटे २:४५ वाजता केज पासून जवळ सांगवी ते पिंपळगाव फाट्यावर एक ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहे. बस पलटी होताच बसने पेट घेतला आहे.

प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढले आहे. अपघाताची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलिस पथक आणि पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इमानदार व चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे यांनी रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल यांच्याशी संपर्क केला. गावकऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघातात किमान वीस ते पंचवीस प्रवाशी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर जीवित हानी झाली नाही मात्र या बसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे.

अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!