• Mon. May 25th, 2026

८०.६० लाखांचे रस्ते काम कागदावरच? केज नगरपंचायतीतील विरोधक गप्प का? खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पक्षाचे नगरसेवक चार वर्षे ‘चिडीचूप’; संतप्त नागरिकांचा सवाल

Bybaba maske

Mar 16, 2026
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

८०.६० लाखांचे रस्ते काम कागदावरच? केज नगरपंचायतीतील विरोधक गप्प का?

खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पक्षाचे नगरसेवक चार वर्षे ‘चिडीचूप’; संतप्त नागरिकांचा सवाल

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज नगरपंचायतीत विविध प्रभागांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली व कॉसिंग बांधकामासाठी सुमारे ८० लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची नोंद कागदावर दिसत असताना, प्रत्यक्षात ही कामे कितपत झाली याबाबत शहरात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम मंजूर असतानाही विरोधीपक्षाच्या नगरसेवकांकडून एकदाही ठोस आवाज उठवला गेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार,

क्र. ७०८ (दि. २३/१२/२०२०) अंतर्गत वार्ड क्रमांक १२ मध्ये मंगळवार पेठ कॉर्नर (विजय प्रकाश ठोंबरे) ते आंबेडकर चौक (शालू सेल, माल स्टोर्स) या दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामासाठी ₹४१,८०,००० निधी मंजूर करण्यात आला होता.

क्र. ७०९ (दि. २३/१२/२०२०) अंतर्गत वार्ड क्रमांक ११ मध्ये सखुबाई (उत्तरेश्वर जाधव यांचे घर ते बसस्थानक) तसेच (लक्ष्मण गवळी) कानडी रोड ते (धनंजय काळेगोरे) या दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली व कॉसिंग बांधकामासाठी ₹१६,२०,००० निधी मंजूर करण्यात आला होता.

क्र. ७०१ (दि. २३/१२/२०२०) अंतर्गत वार्ड क्रमांक १७ मध्ये अजीम शेख यांचे घर ते जाकेर हाफीजसाफ यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली व कॉसिंग बांधकामासाठी ₹१४,६०,००० मंजूर करण्यात आले होते.

या सर्व कामांचा मिळून एकूण निधी ८० लाख ६० हजार रुपये इतका होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या कामांची स्थिती नेमकी काय आहे, निधीचा वापर झाला का, किंवा कामे अपूर्ण राहिली का याबाबत नगरपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

याबाबत नागरिकांनी थेट Bajrang Sonawane यांच्याकडेही प्रश्न उपस्थित केले आहेत. “एवढी मोठी रक्कम केज शहराच्या विकासासाठी मंजूर असताना तिचा योग्य वापर झाला का नाही, याचा जाब विचारणे हे विरोधीपक्षाचे काम नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक असतानाही गेल्या चार वर्षांत एकदाही पत्रकार परिषद, आंदोलन किंवा ठोस विरोध दिसून आला नाही, अशी चर्चा शहरात रंगली आहे. काँग्रेसचे तीन नगरसेवक सत्तेत सहभागी झाल्यानंतर विरोधीपक्ष अधिकच निष्क्रिय झाल्याची टीकाही होत आहे.

पत्रकार किंवा सामान्य नागरिक बाहेर राहूनही माहिती मिळवू शकतात, तर सत्तेच्या आत असलेले लोकप्रतिनिधी ही माहिती का काढू शकत नाहीत? असा सवालही उपस्थित होत आहे.

केज शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या या निधीचा हिशोब नेमका काय? कामे झाली की फक्त कागदावरच राहिली? याबाबत नागरिकांना स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे.

चौकट : विरोधीपक्षाची भूमिका काय?

केज नगरपंचायतीत विरोधी पक्षाकडे एकूण पाच नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. मात्र गेल्या चार वर्षांत या कामांबाबत पत्रकार परिषद, आंदोलन किंवा अधिकृत भूमिका घेतल्याचे फारसे दिसून आले नाही, अशी चर्चा शहरात आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशांच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी विरोधक पार पाडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकट : ८०.६० लाखांच्या कामांचा तपशील

केज नगरपंचायत हद्दीत विविध प्रभागांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली व कॉसिंग बांधकामासाठी मंजूर निधी पुढीलप्रमाणे असल्याची माहिती समोर येत आहे –

• वार्ड क्र.१२ – मंगळवार पेठ कॉर्नर (विजय प्रकाश ठोंबरे) ते आंबेडकर चौक (शालू सेल, माल स्टोर्स)

मंजूर निधी : ₹४१,८०,०००

काम आदेश क्र. ७०८ | दि. २३/१२/२०२०

• वार्ड क्र.११ – सखुबाई (उत्तरेश्वर जाधव यांचे घर ते बसस्थानक) तसेच (लक्ष्मण गवळी) कानडी रोड ते (धनंजय काळेगोरे)

मंजूर निधी : ₹१६,२०,०००

काम आदेश क्र. ७०९ | दि. २३/१२/२०२०

• वार्ड क्र.१७ – अजीम शेख यांचे घर ते जाकेर हाफीजसाफ यांच्या घरापर्यंत

मंजूर निधी : ₹१४,६०,०००

काम आदेश क्र. ७०१ | दि. २३/१२/२०२०

एकूण मंजूर निधी : ₹८०,६०,०००

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!