• Mon. May 25th, 2026

एकच काम, दोन नावे; निधीचा दुबार वापर? केज नगरपंचायतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

Bybaba maske

Mar 17, 2026

एकच काम, दोन नावे; निधीचा दुबार वापर? केज नगरपंचायतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज नगरपंचायतीत एकाच कामासाठी वेगवेगळ्या नावांनी दोन वेळा निधी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी “कंळब रोड ते जेके फंक्शन हॉल” या रस्त्याच्या कामासाठी नागरी वस्ती दलित सुधार योजनेंतर्गत क्रमांक ७०३ अन्वये तब्बल १३ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

यानंतर पुन्हा दि. ३१ मार्च २०२३ रोजी “एल.एफ.सी चौक ते नांलदा विद्यालय” या नावाने त्याच मार्गावरील कामासाठी ७९ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कामांचे ठिकाण आणि स्वरूप जवळपास समान असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

यामुळे एकाच रस्त्याच्या कामाला वेगवेगळी नावे देऊन निधी दुबार उचलला गेला का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणात काम प्रत्यक्षात किती झाले, पहिल्या मंजुरीनंतर काम पूर्ण झाले होते का, आणि पुन्हा इतक्या मोठ्या निधीची गरज का भासली, याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.

दरम्यान, नगरपंचायतीतील जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण दिलेले नाही. पारदर्शकतेच्या दृष्टीने या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

“एकच काम, दोन नावे; निधी कुठे गेला?” — संतप्त नागरिकांचा सवाल

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!