• Mon. May 25th, 2026

आमदार संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर ‘420’ चा गुन्हा; केजमध्ये खळबळ सूतगिरणी अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे अडचणीत; ४६४ विद्यार्थ्यांच्या नावांचा गैरवापर – फसवणुकीचा गुन्हा दाखल

Bybaba maske

Mar 17, 2026

आमदार संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर ‘420’ चा गुन्हा; केजमध्ये खळबळ

सूतगिरणी अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे अडचणीत; ४६४ विद्यार्थ्यांच्या नावांचा गैरवापर – फसवणुकीचा गुन्हा दाखल

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज (जि. बीड)

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी प्रकरणात मोठी कारवाई करत केज पोलीस ठाण्यात माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती तथा सूतगिरणीचे अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे आणि तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (IPC 420) व (IPC 34) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे केजसह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरूकमारे (रा. बीड) यांनी तक्रार दिली असून, त्यांच्या मुलासह तब्बल ४६४ विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे माहिती अधिकारातून मिळवून त्यांच्या परवानगीशिवाय सूत गिरणीच्या सभासद यादीत नावे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सन 2017 ते 2020 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला. संबंधितांना कोणतीही माहिती न देता त्यांना सूत गिरणीचे सभासद दाखवण्यात आले आणि ही यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडून प्रमाणित करून घेण्यात आल्याचेही समोर आले आहे.

ही बाब उघड झाल्यानंतर तक्रारदारांनी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर सूत गिरणी प्रशासनाने संबंधित सभासद यादी रद्द केल्याची माहिती मिळत असली, तरी यामागील संगनमत व फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनिल तुरूकमारे म्हणाले,

“सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे यांच्यासह इतर संबंधितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या घोटाळ्यात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🟥 चौकट (बॉक्स न्यूज):

🔸 विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर IPC 420, 34 अंतर्गत गुन्हा

🔸 ४६४ विद्यार्थ्यांच्या नावांचा गैरवापर

🔸 2017 ते 2020 कालावधी संशयाखाली

🔸 आणखी अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!