• Sat. Apr 18th, 2026

“मटका बंद”च्या गप्पा हवेतच! केजमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त तीन ठिकाणी छापे, पाच जणांवर गुन्हे; तरीही शहरात मटका सुरूच — कारवाईने उघड झाला वास्तव सत्य हेच — कारवाईतूनच उघड झालं वास्तव; केजमध्ये मटका अजूनही जिवंत!

Bybaba maske

Mar 30, 2026
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

“मटका बंद”च्या गप्पा हवेतच! केजमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

तीन ठिकाणी छापे, पाच जणांवर गुन्हे; तरीही शहरात मटका सुरूच — कारवाईने उघड झाला वास्तव

सत्य हेच — कारवाईतूनच उघड झालं वास्तव; केजमध्ये मटका अजूनही जिवंत!

रोखठोक न्यूज केज (प्रतिनिधी)

केज शहर व तालुक्यात मटका पूर्णपणे बंद असल्याच्या दाव्यांना पोलिसांच्या ताज्या कारवाईनेच छेद दिला आहे. केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तीन ठिकाणी छापे टाकत तब्बल २४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२३ मार्च रोजी दुपारी सुमारे १.५० वाजता केज पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण कीर्तने, बाळासाहेब रोडे, जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक शिवाजी कागदे, त्रिंबक सोपणे यांच्या पथकाने कळंब रस्त्यावरील पटेल हॉटेल परिसरात छापा टाकत आसेफ ईसाक शेख (रा. क्रांतीनगर, केज) यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मटक्याच्या चिठ्या, १,२५० रुपये रोख व सुमारे १८ हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला.

यानंतर उमरी रस्त्यावरील वेदांत हॉटेल परिसरात कारवाई करत लियाकत इस्माईल शेख (रा. फुलेनगर, केज) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मटक्याच्या चिठ्या, सुमारे १० हजारांचा मोबाईल व ९१० रुपये रोख जप्त करण्यात आले.

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार भागवत शेलार, दिलीप गित्ते, खांडेकर यांच्या पथकाने उमरी रस्त्यावरील बाळूमामा मंदिराजवळ छापा टाकत महेश दादाराव लांडगे (रा. उमरी रोड, केज) यास पकडले. त्याच्याकडून मटक्याच्या चिठ्या व ४,३०० रुपये रोख जप्त करण्यात आले.

या प्रकरणी महेश लांडगे, आसेफ शेख, लियाकत शेख यांच्यासह डापकर व शहाजी भगवान मुळे (रा. परंडा) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मटका बंद” म्हणणाऱ्यांना थेट सवाल

शहरात मटका पूर्णपणे बंद असल्याच्या गप्पा रंगवल्या जात असताना, प्रत्यक्षात पोलिसांना सलग छापे टाकावे लागत आहेत, हीच वस्तुस्थिती आहे.
मग खरेच मटका बंद आहे का, की फक्त कागदोपत्री बंद दाखवला जातोय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

कारवाई होतेय, पण धंदा सुरूच!

पोलिसांची कारवाई होत असली तरी मटका व्यवसाय अजूनही सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अवैध धंद्याला नेमके संरक्षण कुणाचे, हा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सत्य हेच — कारवाईतूनच उघड झालं वास्तव; केजमध्ये मटका अजूनही जिवंत!

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!