• Sat. Apr 18th, 2026

घरकुल व रस्ता घोटाळ्यावर केज मध्ये महा रस्तारोको! मोहन गुंड यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत उद्या गावकऱ्यांचा रस्ता रोको जनतेने अंदोलन आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे.उद्या जनता  केज नगरपंचायत विरोधात रस्त्यावर उतरणार. 

Bybaba maske

Mar 31, 2026

घरकुल व रस्ता घोटाळ्यावर केज मध्ये महा रस्तारोको! मोहन गुंड यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत गावकऱ्यांचा उद्या रस्ता रोको

जनतेने अंदोलन आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे.उद्या जनता  केज नगरपंचायत विरोधात रस्त्यावर उतरणार. 

केज | प्रतिनिधी

केज नगरपंचायतीतील घरकुल घोटाळा, रस्ते घोटाळा आणि इतर विविध प्रलंबित प्रश्नांवर गेल्या सहा दिवसांपासून गावाचे भूमिपुत्र भाई मोहन गुंड अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने अद्यापही मागण्यांवर ठोस भूमिका घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या वतीने बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी मंगळवार पेठ कॉर्नर, संभाजीराजे चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, घरकुल योजनेतील अनियमितता आणि रस्ते कामांतील कथित घोटाळ्यांमुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने आता जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे.

शहरातील सजग व सुज्ञ नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“चला केज शहर, भ्रष्टाचारातून वाचवू या!” असा निर्धार व्यक्त करत नागरिक आता एकवटत असल्याचे चित्र दिसत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!