• Sat. Apr 18th, 2026

केज नगरपंचायतसमोर सत्ताधाऱ्यांची फजिती; भाई मोहन गुंड ठाम – “माहितीशिवाय आंदोलन मागे नाही!” काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; बाजाराच्या दिवशी भाषणातून टीकेची झोड काँग्रेसला ” हरामखोर” म्हटले तरी नेता,कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिय नाही जनता अंचबीत..

Bybaba maske

Apr 1, 2026

केज नगरपंचायतसमोर सत्ताधाऱ्यांची फजिती; भाई मोहन गुंड ठाम – “माहितीशिवाय आंदोलन मागे नाही!”

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; बाजाराच्या दिवशी भाषणातून टीकेची झोड

काँग्रेसला ” हरामखोर” म्हटले तरी नेता,कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिय नाही जनता अंचबीत..


रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज नगरपंचायतसमोरील भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले असून सत्ताधाऱ्यांची मोठी फजिती झाल्याचे चित्र आहे. गेल्या सहा दिवसांपासून भाई मोहन गुंड हे नगरपंचायतीसमोर अन्नत्याग आंदोलन करत असताना, सुरुवातीचे पाच दिवस ना सत्ताधारी, ना प्रशासन – कुणीही दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून “३० दिवसांत माहिती देऊ, काही माहिती आठ दिवसांत देऊ” अशा स्वरूपाचे मोघम पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र भाई मोहन गुंड यांनी हे पत्र धुडकावून लावत स्पष्ट भूमिका घेतली.

मंगळवारी बाजाराच्या दिवशी नगरपंचायत समोर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असताना सत्ताधाऱ्यांनी संधी साधत भाषणबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत तीव्र टीका करण्यात आली. विशेष म्हणजे, आपल्या सहकाऱ्यांवरच आरोप झाल्यानंतरही काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

सत्ताधाऱ्यांना वाटत होते की, दबाव आणि आश्वासनांमुळे आंदोलन मागे घेतले जाईल. मात्र भाई मोहन गुंड यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले –
“१४ मागण्यांवरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही!”

या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचा पूर्णपणे बूमरँग झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. भाई मोहन गुंड यांच्या ठाम भूमिकेमुळे नागरिकांमध्येही या आंदोलनाबाबत उत्सुकता आणि पाठिंबा वाढताना दिसत आहे.

शहरातील नागरिकांना सत्ताधाऱ्यांच्या “गोड बोलण्याचा” अनुभव आधीपासून असल्याने, यावेळीही आंदोलन थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे न होता आंदोलन अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जनतेत चर्चा :

“आता तरी खरे चित्र समोर येणार का?”

“काँग्रेस व सत्ताधाऱ्यांवर कारवाई होणार का?”

केजमधील हे आंदोलन आता केवळ स्थानिक प्रश्न न राहता, थेट राजकीय संघर्षाचे केंद्र बनले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!