• Sat. Apr 18th, 2026

“दाखवा चौकशीचं पत्र आणि घ्या १ लाख!” – केजमध्ये २.७७ कोटींच्या कामांवर थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान  नगरसेवक कपिल मस्के यांचा नगराध्यक्षा सिता बनसोड यांना खुला चॅलेंज; समाजमंदिर व रस्ते निधीवर प्रश्नचिन्ह

Bybaba maske

Apr 1, 2026

दाखवा चौकशीचं पत्र आणि घ्या १ लाख!” – केजमध्ये २.७७ कोटींच्या कामांवर थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान

 नगरसेवक कपिल मस्के यांचा नगराध्यक्षा सिता बनसोड यांना खुला चॅलेंज; समाजमंदिर व रस्ते निधीवर प्रश्नचिन्ह

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहरातील सुमारे २ कोटी ७७ हजार रुपयांच्या रस्ते व समाजमंदिर कामांतील कथित घोटाळ्यावरून राजकारण तापले असून, नगरसेवक कपिल मस्के यांनी नगराध्यक्षा सिता बनसोड यांना थेट १ लाख रुपयांचे आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे.

भाई मोहन गुंड यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी बोलताना कपिल मस्के यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, गेल्या चार वर्षांत या कामांबाबत चौकशीसाठी जिल्हाधिकारी किंवा संबंधित विभागाकडे एक तरी अधिकृत पत्र दिले असेल, तर ते दाखवावे – आणि तसे सिद्ध झाल्यास १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

कपिल मस्के यांनी यावेळी अनेक कामांवर थेट प्रश्न उपस्थित केले 

 फुले-आंबेडकर नगर येथील समाजमंदिरासाठी आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून आलेला निधी नेमका कुठे गेला?

 कळंब रोड ते जेके फंक्शन हॉलपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी आलेल्या निधीचे काय झाले?

 मंगळवार पेठेत आमदार संगिता ठोंबरे यांच्या घरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी मंजूर निधी कुठे खर्च झाला?

या सर्व प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याचे किंवा संबंधित पत्रव्यवहार सादर करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.

या घोषणेमुळे केजच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्येही “खरं कोण आणि खोटं कोण?” याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, हे आव्हान थेट अन्नत्याग आंदोलनाच्या मंचावरून देण्यात आल्याने या प्रकरणाला अधिकच धार आली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा :

 “आव्हान स्वीकारणार की मौन बाळगणार?”

 “२.७७ कोटींचा हिशेब कधी देणार?”

केजमधील या प्रकरणामुळे आता सत्ताधाऱ्यांवर पारदर्शकतेचा दबाव वाढला असून, पुढील काही दिवसांत या वादाला आणखी तीव्र स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!