• Sat. Apr 18th, 2026

परळीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला नगरसेवकासह दोन मुलगे गंभीर जखमी; बीड जिल्ह्यात खळबळ 

Bybaba maske

Apr 9, 2026

परळीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

नगरसेवकासह दोन मुलगे गंभीर जखमी; बीड जिल्ह्यात खळबळ 

रोखठोक न्यूज वार्ताहर परळी

बीड जिल्ह्यातील परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक अजिज कच्ची यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात नगरसेवकांसह त्यांचे दोन मुलगे गंभीर जखमी झाले असून एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील आझाद नगर परिसरात रात्री आठच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी नगरसेवक अजिज कच्ची यांच्या घरावर धाड टाकून हल्ला चढवला. यावेळी हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत नगरसेवक आणि त्यांच्या दोन मुलांना गंभीर जखमी केले. 

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्व. रा. ती. शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

या थरारक हल्ल्यामुळे परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परळी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

 

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!