• Fri. Oct 23rd, 2026

केजमध्ये देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई २०० बाटल्या देशी दारूसह तब्बल १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी ताब्यात

Bybaba maske

Sep 25, 2026

केजमध्ये देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

२०० बाटल्या देशी दारूसह तब्बल १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी ताब्यात

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज शहरात देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका इसमावर केज पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २०० सीलबंद बाटल्या देशी दारू आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शाबाज मोहसीन सय्यद (वय ३० वर्षे, रा. अजीजपुरा, केज, ता. केज, जि. बीड) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल सूर्यतळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत केज शहरात एक इसम देशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच प्रभारी अधिकारी  राहुल सूर्यतळ यांनी डी.बी. पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई करून आरोपीकडून बॉबी संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या २०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. प्रत्येकी ४० रुपये किमतीप्रमाणे या दारूची किंमत ८ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली HERO X-TREME मोटारसायकल, किंमत १ लाख ५ हजार रुपये, असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, केज पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!