केज शहरातील तहसील ही अंबाजोगाई ते बीड रोडवर टोलेजंग इमारत उभी आहे.पण तहसील कार्यालयाच्या चोहोबाजूंनी खुप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्या मुळे तहसील कार्यालय कोठे आहे हे शोधत किंवा अभ्यागताला विचारत तहसील कार्यालयात यावे लागते,कोणते ही राजकीय पुढारी,आमदार, खासदार, जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी,तहसीलदार यांना ज्या गेटने यावे लागते ते दोन्ही गेट अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत.अश्चर्य म्हणजे तहसील चे एक गेट बंध ठेवून अतिक्रमण धारकास मदतच केली जाते,कारण एक गेट सदैव बंदच असल्या कारणाणे तेथे सगळे अतिक्रमण झाले आहे.एक विषेश जर कोणाला आंदोलन करायचे असेल तर तहसील कार्यालयासमोर जागाच नाही सरळ महामार्गाच्या रस्त्यावर बसावे लागते,तिकडून भीती एखादे वाहन येऊन चिरडते का काय?
गमतीचा भाग म्हणजे जर आंदोलन करते आमरण उपोषणास बसले असतील तर बाजूलाच,वडापाव,भेळ,भजे, जिलेबी चा घमघमाट दरवळलेला असतो,भुकेचा आगडोंब पोटात पसरलेला असताना त्या पक्कवानाचा दरवळ सहन करून अग्निपरीक्षाच द्यावी लागती.