केज शहरातील मंगळवार पेठ येथे आठवड्यांचा बाजार भरतो,त्या मुळे या रोडवर विविध व्यावसायिकाने आपले व्यावसाय स्थापली आहेत,शहराची सर्वात जुने मार्केट ह्याच रोडवर माजी आमदार चे घर,माजी जिल्हापरिषद अध्यक्षांचे घर पण कित्तेक वर्षा पासुन या रोडची दैना कांही फिटेणा.ह्या रोडवर मंगळवारी भरणारा आठवडी बाजारात भाजी विक्रेते तसेच किरकोळ व्यावसायिक यांच्या कडून नगरपंचायत कर वसूल करते पण कुठलीच सुविद्या पुरवली जात नाही,याच रोडवर केज शहरातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे,हाच रोड मुस्लीमाच श्रध्दा स्थान असणाऱ्या दर्ग्या कडे जाणारा रोड पण ह्या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे.हा लवकरात लवकर करावा व या मध्ये व्यापारी महासंघाने लक्ष देऊन नगरपंचायत च्या माध्यमातून हा रोड करून घ्यावा असे समस्त जुन्या केज मधील नागरिक व व्यावसायिकाने मागणी केली आहे.