• Wed. Jun 3rd, 2026

मौखिक आरोग्याच्या काळजी घ्या…डाॅक्टर रमण दळवी 

Bybaba maske

Sep 9, 2022

मौखिक आरोग्याच्या काळजी घ्या…डाॅक्टर रमण दळवी 

प्रत्येक सहा महिन्यात तपासणी करूण घ्यावी

       राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय केज यांच्या कार्यक्रमांतर्गत जय भवानी कन्या प्रशाला येथे उपस्थित विद्यार्थिनींना दंत आरोग्य व मौखिक आरोग्य यांच्या बद्दल केज शहरातील सर्वात जुने दंतचिकित्सक डॉ. रमण दळवी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले पुढे बोलताना त्यांनी अवरजून सांगतिले की सध्या चाॅकलेट,जंगफूड खाण्या कडे लहान मुलाचा ओढा वाढला आहे.त्या मुळे मुलाचे दात खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे,त्या साठी पाल्यानी सुद्धा मुलांनच्या आहारात चाॅकलेट,जंगफूड इत्यादी पदार्थाचा वापर टाळावा व मुलांना सकाळी व रात्री झोपताना ब्रश करण्याचीही सवय लावावी त्यानंतर विद्यार्थिनींची दंत तपासणी देखील करण्यात आली.

  श्रीमती सीता गिरी समुपदेशक यांनी किशोरवयीन मुलींना असणाऱ्या आरोग्य विषयक अडचणी आणि घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

शालेय तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. रमण दळवी, श्री. श्रीकांत उजगरे आणि श्रीमती सीता गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले..

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!