• Sun. Apr 19th, 2026

अँटीबायोटीक औषधाने होऊ शकते प्रतिकार शक्ती कमी.

Bybaba maske

Sep 10, 2022

अँटीबायोटीक औषधाने होऊ शकते प्रतिकार शक्ती कमी.

डाॅक्टरच्या सल्या शिवाय घेऊ नका औषधोपचार 

 

– तुम्ही कुठल्याही दुखण्यासाठी डॅाक्टरांकडे जाता तेव्हा काय सांगता? ॲंटीबायोटिक द्या, लवकर बरं वाटू दे. थोडे हुशार लोक त्यापुढे जाऊन मेडिकलमध्ये जातात आणि ॲंटीबायोटिक मागतात. आपल्याकडे सर्रास ते मिळतंही. पण त्यामुळे लवकरच अशी वेळ येणार आहे की कुठलंही ॲंटीबायोटिक आपल्यावर परिणामच करेनासं होणार आहे. काही आजारांच्या बाबतीत हे घडून झालंय. ॲंटीबायोटिक औषधांची संख्या मर्यादित आहे. बॅक्टेरिया मात्र असंख्य. शरिराला गरज नसताना त्यात ॲंटीबायोटिक घालवून आपण ॲंटीबायोटिक रेझिस्टंन्स ओढवून घेतलंय. त्यामुळे भविष्यात आपण आजारी पडू आणि आपल्यावर कुठलंच औषध चालणार नाही असं होणं शक्य आहे. हे टाळायचं असेल तर मनमानी औषधं घेणं थांबवा. घरातले लोकं कुठली औषधं घेतात, कुणाला विचारुन घेतात याकडे लक्ष ठेवा. डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. डॅाक्टर ॲंटीबायोटिक देत नसतील तर तुमच्या आजाराला त्याची गरज नाही हे ओळखा. उठसूट ॲंटीबायोटिक घेऊ नका. फार्मसिस्टला विचारुन औषधं घेऊ नका. डॅाक्टरांचं शिक्षण आणि निदान यावर विश्वास ठेवा.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!