• Fri. Jun 19th, 2026

केज शहरात चोरांनी डोके वर काढले.

Bybaba maske

Sep 13, 2022

केज शहरात चोरांनी डोके वर काढले.

पोलीसांचा ताप वाढला.

   केज शहरात चोरीच प्रमाण वाढत आहे.गेल्या 2 सप्टेंबर रोजी एक माहीर वासीन महिला आपल्या माहीरास जात असताना केज शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात उतरत असताना तिच्या वर पाळत ठेवून असलेल्या काही अज्ञात महिलांनी 3 लाख 50 हजारांचा सोन्याचे दागिने चोरले तसेच 10 सप्टेंबर रोजी केज शहरातील दैनिक लोकमत चे तालूका प्रतिनिधी मा. दिपक नाईकवाडे यांची मोटारसायकल मंगळवार पेठ येथून चोरीस गेली.तसेच शहरातील फुलेनगर भागातील वैभव मिलींद ठोके यांची 55 हजार किंमतीची मोटारसायकल 30 ऑगस्ट रोजी चोरीला गेली.या गेल्या कांही दिवसा पासुन घडलेल्या घटने मुळे चोर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच या चोरांचा लवकरात लवकर तपास करावा असे जनतेतून मागणी होत आहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!