• Wed. Jun 3rd, 2026

महिलांचा भव्य निषेध शांततेत केज तहसील वर दाखल…  

Bybaba maske

Sep 15, 2022

 

केज/प्रतिनिधी 

  बिलकीस बानो यांच्या वर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या,हजरत मोहम्मद यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानाजनक टिप्पणी करणान्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कठोर कायदा लागू करावा.
भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावा.या प्रमुख मागण्यांसाठी केज संविधान संघर्ष बचाव समितीच्या वतीने गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२रोजी सकाळी११वाजता.
हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा पासुन तहसिल कार्यालयावर महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता.केज शहरात महीलांचा सर्वात मोठ्या मोर्च्याने शांतमय संपन्न झाले यावेळी केज हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा सुरुवात होऊन केज तहसील कार्यालय येथे धडकून सभेत रुपांतर झाले.
यावेळी मुस्लिम महिलासह विद्यार्थी यांची उपस्थित होती.बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा देण्यात यावी,यासाठी केज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला. विद्यार्थी यांच्यासह मुस्लिम युवक हाजारोच्या संख्येने व महिला उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!