• Wed. Jun 3rd, 2026

नालंदा विद्यालय केज येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर.

Bybaba maske

Sep 15, 2022

केज प्रतिनिध 

राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियानांतर्गत विविध शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दंत आणि मौखिक आरोग्य यांच्या बद्दलची माहिती देऊन जनजागृती करण्याचे अभियान चालू आहे. त्याअंतर्गत आज नालंदा विद्यालय, केज येथे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी करावयाची उपायोजना याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांचे मार्गदर्शन लाभले तर दंत विभाग प्रमुख डॉ. रमण दळवी , दंत सहाय्यक श्रीकांत उजगरे व समुपदेशक श्रीमती सीता गिरी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. उपस्थित 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून उपचार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चॉकलेट, जंग फूड तसेच व्यसनांपासून दूर राहावे तसेच दोन वेळा सकाळ आणि रात्री ब्रश करावा जेणेकरून दंत आरोग्याच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करता येतील अशा आरोग्यदायी सवयींसाठी प्रोत्साहित करण्यात आले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!