नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल गैरमान्यता प्राप्त झालेली चौकशी करा-ज्योती सांबरे
विद्यार्थ्यांची व पालकाची होते मोठी फसवणूक…
केज/प्रतिनिधी
नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल डोनगाव पाटी ता.केज येथे अनधिकृत विना मान्यता प्राप्त शाळा २०२१-२२पासून कार्यरत असून या शाळेला कोणत्याही प्रकारची पूर्व मान्यता घेण्यात आलेली नाही.
शाळेला युडायस नंबर नसून या शाळेच्या कार्यकारी मंडळाकडून १ते५वी पर्यंतचे विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.
या प्रकरणाची गंभीरपणे जिल्हाधिकारी यानीब सखोल चौकशी करून संबधीत कार्यकारी मंडळांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे तक्रारदार ज्योती सांबरे व विजया कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे माहिती दिली आहे.