केज नगरपंचायत च्या आडमुठ्या धोरणा मुळे चौकाचे व रस्त्याचे काम राहीले.
छत्रपती शिवाजीमहाराज चौक व जयभवानी चौकाच्या काम लवकर करावे
केज प्रतिनिधी
केज नगरपंचायत च्या आडमुठ्या धोरणा मुळे छत्रपती शिवाजीमहाराज चौकाच आकार हा खुप मोठा झाला आहे त्या मुळे मोठे वाहन वळवता येत नाही व चौकाच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण व मोठी रहदारी या मुळे या चौकात वाहतूक कोंडी नेहमीचीच या मुळे चौकात छोटे मोठे अपघात हे सारखेच होत असतात त्या साठी रुंदी कमी गरजेच आहे तसेच जयभवानी चौक धारूर रोड, येथील चौक हा मधोमध नसून एक बाजूस आहे.धारूर रोड ने येणाऱ्या वाहनाना वळताना समोर चे काहीच दिसत नाही व रोड उताराचा असल्या कारणाने वाहने सुसाट येतात काही महिन्या पुर्वी उसाचा ट्रक पलटी होऊन त्या खाली दोन जवान मुले हकनाक मेले.समोर पेट्रोल पंप आहे त्या मध्ये सुद्धा दोन वेळेस सुसाट येणारे वाहन येऊन धडकले होते एका वाहनाने तर सरळ पेट्रोल भरण्याच्या मशीनच्या चबूतर्यास धडकले त्या वेळेस थोडक्यात अनर्थ होता होता टळला.सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सरांनी या संदर्भात वेळो वेळी आवाज उठवला पण ढिम्म नगरपंचायत कांहीच पाऊले उचलण्यास तयार नाही त्या मुळेच जयभवानी चौकातील रस्ता करायचा एचपीएम या रोड बनवणाऱ्या कंपनीने बनवायचा ठेवला आहे.नगरपंचायत अजून किती बळी घेण्याची वाट बघणार?