• Fri. Sep 11th, 2026

पाच रुपयावरून वाद; प्रवाशाने घेतला चावा!

Bybaba maske

Sep 28, 2022

पाच रुपयावरून वाद; प्रवाशाने घेतला चावा!

 

रोखठोक न्यूज नेटवर्क

लातूर : तिकिट घेतल्यानंतर प्रवाशाने सुट्या पैशांची मागणी केली, याच पैशाच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून चार जणांनी मारहाण केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील सिंधगाव मार्गावर रविवारी घडली. एका प्रवाशाने वाहकाच्या पिंडरीला (पायाला) चावा घेत जखमी केले.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी बालाजी आमरस मोरे (वय ३३, रा. गुत्ती, ता. जळकोट) हे लातूर आगारात गेल्या दहा वर्षांपासून वाहक म्हणून सेवारत आहेत. दरम्यान, . ते लातूर बसस्थानकातून रेणापूर- सिंधगाव- पोहरेगाव बस घेऊन शनिवार, २४ सप्टेंबर रोजी मार्गस्थ झाले होते. दरम्यान, सिंधगाव येथील चौकामध्ये प्रवासी उतरण्यासाठी बस थाबविण्यात आली. यावेळी लातूर येथून दोघा प्रवाशांनी ५०० रुपयांच्या नोटा दिल्या.
एकाचे त्यांनी सुट्टे पैसे दिले. दुसऱ्याचे ४५ रुपये तिकिट झाले होते. त्यांना वाहकाने ४५० रुपये सुट्टे दिले आणि पाच रुपये एका प्रवाशाला देण्याबाबत सांगितले. यावेळी पाच रुपयासाठी मी त्यांच्या मागे फिरु का, असा सवाल उपस्थित केला. यातून वादावादी, बाचाबाची झाली.दरम्यान, वाहक मोरे यांना नवनाथ चेवले याच्यासह अन्य तिघांनी (सर्व रा. सिंधगाव, ता. रेणापूर) यांनी संगणमत करून फिर्यादी वाहकाला सुट्टे पैशाच्या कारणावरुन, कुरापत काढून शिवीगाळ करत धक्काबुकी करून मारहाण केली. यावेळी चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीने वाहकाच्या उजव्या (पिंडरी) पायाला जोराने चावा घेत जखमी केले. त्याचबरोबर शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा वाद सुरू असताना बसमधील प्रवाशांनी सोडविण्यासाठी प्रयत्न केला होता.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!